रेशन धान्याची पाच रुपये किलोने खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:22 AM2021-09-14T04:22:43+5:302021-09-14T04:22:43+5:30
जिल्ह्यात ५ लाख ८९ हजार ९९१ एकूण रेशनकार्डधारक आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न याेजनेअंतर्गत अंत्याेदय आणि प्राधान्य कुटुंब याेजनेतील ...
जिल्ह्यात ५ लाख ८९ हजार ९९१ एकूण रेशनकार्डधारक आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न याेजनेअंतर्गत अंत्याेदय आणि प्राधान्य कुटुंब याेजनेतील शिधापत्रिकाधारकांना नाेव्हेंबर २०२१ पर्यंत माेफत धान्य मिळणार आहे. आतापर्यंत या याेजनेचा २२ लाख ३५ हजार नागरिकांना लाभ मिळाला आहे. मात्र, माेफत धान्याची विक्री हाेत असल्याचे प्रकार सुरू आहेत.
जिल्हाभरात खासगी खरेदीदार धान्य घेत आहेत. सामान्य नागरिकांकडून कमी दराने धान्य घेऊन ते जादा दराने व्यापाऱ्यांना विक्री केले जात आहे. त्यावर आता प्रशासकीय कारवाई करणे गरजेचे आहे.
पाच रुपये
किलो तांदूळ
स्वस्त धान्य दुकानातून घेतलेले धान्य ५ रूपये किलाे दराने विक्री हाेत आहे. त्यात प्रामुख्याने तांदळाचा समावेश आहे. घराेघरी तांदूळ खरेदीदार फिरत आहेत.
जनता काॅलनी
शहरातील जनता काॅलनी परिसरातील नगरामध्ये स्वस्त धान्याची खरेदी खासगी व्यापारी करत असल्याचे आढळले. त्याला प्रतिसादही मिळत आहे.
नायगाव तालुका
तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी धान्य खरेदीदार फिरत आहेत. ४ रुपये, ५ रुपये अशा दराने धान्याची खरेदी केली जात आहे.
सिडकाे परिसर
सिडकाे भागातही अनेक नागरिक धान्याची विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दर दाेन ते तीन दिवसाला खरेदीदार या भागात फिरत आहेत.
सामान्यांसाठी सरकारकडून मदत
काेराेना संकटात अनेकांचा राेजगार हिरावला. त्याचवेळी काेराेना प्रार्दुभाव राेखण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन केले हाेते. अशा परिस्थितीत हातावर पाेट असलेल्या सामान्य नागरिकांना मदत व्हावी यासाठी केंद्र सरकाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न याेजनेअंतर्गत माेफत तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला. हे तांदूळ वाटपही अद्यापही सुरू आहे. त्याची खासगी विक्री करणे चुकीचे आहे.
- लतिफ पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी