रद्द केलेल्या भरतीची फीस परत करा; विद्यापिठासमोर मनसे विद्यार्थी सेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 07:00 PM2019-01-30T19:00:43+5:302019-01-30T19:04:11+5:30
फिस त्वरीत परत करावी या मागणीसाठी आज मनसे विद्यार्थी सेनेच्या वतिने विद्यापीठासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले .
नांदेड - स्वामी रामानंद तिर्थ विद्यापिठात विविध पदासाठी भरती करण्यात येणार होती मात्र ती भरती रद्द करण्यात आली . या भरतीसाठी ज्या उमेवारांनी फिस भरली होती त्या उमेदवारांची फिस त्वरीत परत करावी या मागणीसाठी आज मनसेविद्यार्थी सेनेच्या वतिने विद्यापीठासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले .
स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठात सन २०१५ मध्ये विविध पदासाठी भरती करण्यात येणार होती . त्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन ईच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते . अर्जासोबत उमेदवारांना शुल्क आकारण्यात आले होते . परिक्षा शुल्क डीडी रुपात स्विकारण्यात आले . तत्कालीन परिस्थिती दुष्काळी होती तरिही नौकरी मिळेल या आशेवर बेरोजगार उमदेवारांनी शुल्क भरले होते. ईच्छूक उमेदवारांनी अर्ज भरल्याने परिक्षेची तयारी करीत होते . मात्र भरती रद्द झाल्याने उमेदवारांत नैराश्य निर्माण केले गेले. विद्यापिठ प्रशासनाने संबधित उमेदवारांशी सांधा संपर्क साधला नाही. भरती रद्द झाल्याचे कळविले नाही. तसेच बेजबाबदार प्रशासनाने उमेदवाराकडून घेतलेले शुल्कही परत केले नाही. सन २०१५ पासून ही रक्कम विद्यापिठ वापरत आहे . बेरोजगारांच्या मेहनतीवर विद्यापिठाने डल्ला मारला आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
संबधित उमेदवारांना त्या भरतीचे शुल्क व्याजासह परत करावे यासाठी आज सकाळी मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टासिंग जहागिरदार , मनविसे जिल्हाध्यक्ष राजू पा बरडे यांच्या नेतृत्वाखाली बोंब मारो आंदोलन करण्यात आले .
यावेळी जिल्हाध्यक्ष रवि राठोड, शहराध्यक्ष शफीक अब्दुल, गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड , गणेश तोगरवार, सुभाष भंडारी , महेश ठाकूर , शक्ती परमार , अनिकेत परमार , अंकित तेहरा , शिवराज पाटील , गजु यादव , शंकर सरोदे, सतिश वाघमारे, योगेश चौधरी, श्रीकांत देशमुख , बालाजी पावडे , कृष्णा पांचाळ, नारायण हिलाल, संतोष बनसोडे, रवि जाधव , मष्णाजी पा ., अमोल पोतलोड, शंकर पिटलेवाड, बजरंग पाबाळू, संजय भूसापले, सागर ठाकूर, अनिकेत परिदेशी आदिची उपस्थिती होती . फीस परत न केल्यास विद्यापिठास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला .