साहेब... घरकुल पूर्ण झाले, अनुदानाची रक्कम मिळेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:53 PM2018-03-20T18:53:53+5:302018-03-20T18:53:53+5:30

घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी  १८०  घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत.

Saheb ... the home is complete, will you get the donation money ? | साहेब... घरकुल पूर्ण झाले, अनुदानाची रक्कम मिळेल का ?

साहेब... घरकुल पूर्ण झाले, अनुदानाची रक्कम मिळेल का ?

googlenewsNext

किनवट (नांदेड ) :  घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी  १८०  घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत.

कच्च्या  कुडाच्या घरात राहणार्‍या पात्र लाभार्थ्यांची रमाई आवास, शबरी आवास, आदिम कोलाम व  इंदिरा आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना याअंतर्गत घरकुल योजनेसाठी निवड झाली. पहिला, दुसरा हप्ताही  मिळाला. बँक विलीनीकरणानंतर प्रधानमंत्री  आवास योजना व रमाई आवास योजनेच्या  जवळपास १८०  लाभार्थ्यांचे आयएफसी कोडमुळे घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही कुणाचा दुसरा, कुणाचा तिसरा, कुणाचा चौथा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर  जमाच झाला नसल्याने पक्क्या घरांचे स्वप्न पाहणारे लाभार्थी बँकेचे व पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे दरवाजे झिजवून बेजार झाले आहेत.

‘साहेब... घरकुल पूर्ण झाले. घरकुलाची रक्कम मिळेल का?’  असा आर्त टाहो लाभार्थी फोडत आहेत. घरकुल मिळाल्याच्या आनंदाने इकडूनतिकडून जमवाजमव करुन घरकुलाचे हप्ते मिळणार या भरवशावर उसनवारीने पैसे काढणार्‍यांना  घरकुलाचे हप्ते थांबल्याने परतफेड करावी कशी? ही चिंता भेडसावू लागली आहे. उद्भवलेल्या  आयएफसी कोड दुरुस्त करुन पंचायत समितीच्या  खात्यावर  घरकुलाच्या  बांधकामापोटीची रक्कम जमा न झाल्यास आर्थिक अडचणीत सापडलेले लाभार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात  आहेत.

Web Title: Saheb ... the home is complete, will you get the donation money ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.