संत रविदास तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:16+5:302021-02-17T04:23:16+5:30
नांदेड: संत गुरू रविदास महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता तसेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण ...
नांदेड: संत गुरू रविदास महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता तसेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी शेवटपर्यंत परिश्रम घेतले, असे प्रतिपादन भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अनंत राऊत यांनी केले.
नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील गुरू रविदास महाराज मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरू रविदासजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत रविदास महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्यंकटराव दुधंबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरु रविदासजी महाराज मंदिरात पार पाडण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. अनंत राऊत बोलत होते. याप्रसंगी गुरू रविदासजी मंदिराचे अध्यक्ष ब्रम्हाजी गायकवाड, कांशी-माया प्रबोधन मंचचे अध्यक्ष तुकाराम टोम्पे तथा सचिव इंजि. पदमाकर बाबरे, अ. भा. र. धर्म संघटनेचे माणिक अन्नपूर्णे, शिवानंद जोगदंड, रा. च. म.चे राज्य कार्यकारिणी सदस्य अस्तिक कोरडे,रा.च.म.चे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड व जिल्हाध्यक्ष माधवराव निंबाळकर यांच्यासह अ. भा. गु. र. धर्म संघटनेचे प्रा. नागनाथ गिरगावकर, गोविंदराव माऊली पार्डीकर, विठ्ठलराव वाघमारे तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास टोम्पे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.अनंत राऊत पुढे बोलताना म्हणाले, संत रविदास महाराजांनी जातीभेद नष्ट करून समता प्रस्थापित करण्याकरिता अविरतपणे प्रयत्न केले. त्याचवेळी, गुरू रविदासांनी देशभर भ्रमंती करून समस्त बहुजनांना एकत्रीत आणण्याचा प्रयत्न केला असल्याचेही नमूद करून बौद्ध धम्म हा विश्वातील सर्वश्रेष्ठ मानवतावादी तथा विज्ञानवादी धर्म असल्याचे आवर्जून सांगितले. जयंतीमहोत्सवादरम्यान, गुरु रविदास महाराजांच्या विचाराचे प्रचारक रविश्री रविदासिया गोपीनाथजी गाडे महाराज निंबोडीकर व आनंदजी पवार महाराज चितळीकर यांनी संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांचे जीवन व कार्य या विषयावर समाजबांधवांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक तुकाराम टोम्पे यांनी केले. सूत्रसंचालन पदमाकर बाबरे यांनी, तर चांदोजी सोनटक्के यांनी आभार मानले. व्यंकटराव दुधंबे यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर रविदास मंदिरातील महाप्रसादाच्या कार्यक्रमाने प्रस्तुत जयंतीमहोत्सवाची सांगता झाली. जयंतीमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ब्रम्हाजीराव गायकवाड, शंकर पेटकर, संभाजी घडलिंगे, रानबाजी वानखेडे, श्रीराम गोरे, व्यंकटराव सोनटक्के, व्यंकटराव दुधंबे, चांदोजी सोनटक्के आणि त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच जयंती मंडळाच्या