जांब, सगरोळी सर्कलमध्ये दिलासादायक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:11 AM2020-06-26T11:11:23+5:302020-06-26T11:11:43+5:30
नांदेड जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे.
नांदेड: गुरुवारी रात्री मुखेड तालुक्यातील जांब आणि बिलोली तालुक्यातील सगरोळी सर्कलमध्ये दिलासादायक पाऊस पडला. तथापी, जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे.
जांब येथे २६ तर सगरोळी सर्कलमध्ये ६० मि. मी. पाऊस पडला. बिलोलीत ७ तर कुंडलवाडी सर्कलमध्ये ५ मि. मी.पावसाची नोंद झाली. मुखेड तालुक्यातील जांब वगळता अन्य सर्कलमध्ये पाऊस पडल्याची नोंद नाही. बुधवारी रात्री हिमायतनगर तालुक्यात पाऊस पडला. देगलूर तालुक्यात गुरुवारी रात्री दिलासादायक पाऊस पडला. किनवट, माहूर, हदगाव, अर्धापूर, कंधार, लोहा, उमरी, धर्मबाद, मुदखेड, नायगाव, नांदेड तालुक्यात पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे पाऊस नसल्याने चिंतेत असताना दुसरीकडे परलेलं सोयाबीन न उगविल्याने अडचणीत सापडला आहे. सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे तर पडलेल्या अल्प पावसावरच शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीची गडबड केल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारपर्येंत जिल्ह्यातील सुमारे १२३८ शेतकऱ्यांनी सोयाबीन न उगविल्याच्या तक्रारी संबंधिताकडे केल्या आहेत.