जिल्ह्यातील प्रायोगिक तत्त्वावर निवडक शाळा, अंगणवाड्या व आरोग्य केंद्र होणार पंचतारांकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:33+5:302021-02-16T04:19:33+5:30

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आ. सतीश चव्हाण, आ. राम पाटील रातोळीकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. राजेश पवार, ...

The selected schools, anganwadas and health centers in the district will be five-star on an experimental basis | जिल्ह्यातील प्रायोगिक तत्त्वावर निवडक शाळा, अंगणवाड्या व आरोग्य केंद्र होणार पंचतारांकित

जिल्ह्यातील प्रायोगिक तत्त्वावर निवडक शाळा, अंगणवाड्या व आरोग्य केंद्र होणार पंचतारांकित

Next

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आ. सतीश चव्हाण, आ. राम पाटील रातोळीकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. राजेश पवार, अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, नियोजन उपायुक्त रवींद्र जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील शाळा भौतिकदृष्ट्या समृद्ध, सर्वांगसुंदर आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचा प्रकल्प म्हणजे नांदेड जिल्हा ५ स्टार स्कूल्स आहे. यात पाच मूळ मुद्यांवर काम करण्यात येणार आहे. शाळांच्या भौतिक सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक पद्धती, लोकसहभाग आणि अभिसरण, शिक्षक समृद्धी, सकारात्मक बदल या मुद्यांवर जिल्ह्यातील निवडक शाळांमध्‍ये काम करण्यात येणार आहे, तर जिल्ह्यातील निवडक अंगणवाड्यांमधून लाभार्थ्‍यांना प्रभावीपणे, तसेच जलदगतीने दर्जेदार व गुणवत्त्वापूर्ण सुविधा पुरविणे. अंगणवाडी केंद्राचे सुशोभीकरण करणे, पायाभूत सुविधा पुरविणे, अंगणवाडी इमारतीमध्‍ये शौचालयाची सुविधा, पिण्‍याच्‍या शुद्ध पाण्‍याची व्‍यवस्‍था, तसेच अंगणवाडी केंद्राचा परिसर स्‍वच्‍छ व निटनेटका ठेवण्‍यासाठी ‘सुंदर माझी अंगणवाडी’ उपक्रम राबविणे. याबरोबरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सर्व पदे भरणे, तसेच अंगणवाडी कार्यकर्ती यांना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देऊन दर दोन वर्षाला उजळणी प्रशिक्षण घेण्‍यात येणार आहे. या माध्‍यमातून अंगणवाड्यांचे मूल्‍यांकन करून निवडक पंचतारांकित अंगणवाड्या करण्‍यात येतील.

पंचतारांकित प्राथमि‍क आरोग्‍य केंद्र उपक्रमात जिल्ह्यातील निवडक प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये दर्जात्‍मक सेवा मिळविण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या गुणवत्तेसह सुधारणा होणे, तसेच लोकाभिमुख पूर्ण क्षमतेने आरोग्‍य सेवा कार्यान्वित करण्‍यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्‍धता, मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापन, लोकसहभागातून आरोग्‍य संवर्धन, दर्जेदार व गुणवत्तापूर्वक सेवा, विविध राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांतर्गतची उदिष्‍टपूर्ती व लाभार्थ्‍यांच्या समाधानासह आरोग्‍य केंद्र खाजगी रुग्‍णालयासारखे कॉर्पोरेट करणे. विशेषत: रुग्‍णांच्‍या समाधानावर याचे मूल्‍याकंन राहणार आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या संकल्‍पनेतून नांदेड जिल्ह्यात राबविण्‍यात येत असलेल्‍या पंचतारांकित शाळा, अंगणवाडी व आरोग्‍य केंद्र या उपक्रमाच्‍या कृती पुस्तिकेचे विमोचन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, राज्‍यमंत्री संजय बनसोडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, तसेच उपस्थित मान्‍यवरांना ‘मुलीचे नाव घराची शान’ उपक्रमाअंतर्गत घरावर लावण्‍यासाठीची मुलींच्‍या नावाची पाटी देण्‍यात आली. नांदेड जिल्ह्याने पंचतारांकित शाळा, अंगणवाडी व आरोग्‍य केंद्र करण्‍याच्‍या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, राज्‍यमंत्री संजय बनसोडे यांनी कौतुक करून सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: The selected schools, anganwadas and health centers in the district will be five-star on an experimental basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.