महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:17+5:302021-07-22T04:13:17+5:30
दुचाकी चोरटे सुसाट नांदेड- शहर आणि जिल्ह्यात दुचाकी चोरटे सध्या सुसाट आहेत. दोन-चार दुचाकी पकडल्यानंतर स्वत:ची पाठ थोपटून घेणा-या ...
दुचाकी चोरटे सुसाट
नांदेड- शहर आणि जिल्ह्यात दुचाकी चोरटे सध्या सुसाट आहेत. दोन-चार दुचाकी पकडल्यानंतर स्वत:ची पाठ थोपटून घेणा-या पोलिसांच्या नाकावर टिच्चून दररोज दुचाकी लांबविण्यात येत आहे. मंगळवारी दुचाकी चोरीचे आणखी पाच गुन्हे दाखल झाले.
विमानतळ हद्दीत बसंतानगर येथे रवी आनंदराव सरवतकर, वजिराबाद हद्दीत गुरुद्वारा गेट क्रमांक ४ सुखचेतसिंघ खेरा, नांदेड ग्रामीण हद्दीत रामनगर येथून संजयसिंह गोरे, भाग्यनगर हद्दीत गुरुजी हॉस्पिटलसमोरून ॲड. रमेश राजूरकर तर उमरी येथे आनंदीबाईनगरातून नागोराव बेलुरे यांची दुचाकी चोरीला गेली आहे.
माहेरात आलेल्या विवाहितेला मारहाण
दुकान टाकण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यास असमर्थ ठरलेल्या पीडितेला माहेरी सोडण्यात आले. त्यानंतर माहेरी येऊन मारहाण करण्यात आली. या प्रकरणात संदीप बाबाराव पवार, बाबाराव पवार, ध्रुपदाबाई पवार, प्रदीप पवार, दिलीप पवार यांच्याविरोधात अर्धापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
जिल्ह्यात चार जुगार अड्ड्यांवर धाडी
पोलिसांनी जिल्ह्यात उमरी, माळाकोळी, धर्माबाद आणि मरखेल या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाडी मारल्या. बळेगाव ते हातनी रस्ता, मौजे सावरगाव, फुलेनगर, धर्माबाद आणि हाणेगाव बसस्थानक येथे हा जुगार सुरू होता. या चारही ठिकाणांहून २० हजार रुपये जप्त करण्यात आले.
मुक्रमाबादेत ४५ हजारांची दारु जप्त
मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी धाडी मारून पोलिसांनी ४५ हजारांची अवैध दारू जप्त केली. दापका गुंडोपंत, मौजे हाळणीफाटा यासह मुक्रमाबाद शहरातही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात मुक्रमाबाद ठाण्यात गुन्हा नोंद झाला.