हदगाव प्रशासनाच्या विरोधात आतापर्यंत पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:02 AM2018-12-17T01:02:10+5:302018-12-17T01:02:38+5:30
तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सुनील चौरे ।
हदगाव : तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे या विभागाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चोरंबा खुर्द येथील रुद्राजी झुरोळे नावाच्या शेतकऱ्याला तलाठी सातबारा देत नसल्याने ते तहसीलदारांकडे गेले. त्यांनी हे काम माझे नाही म्हणून त्यांना पळविले.तोच राग मनात धरुन शेतकºयाने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखून कर्मचा-यांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर वायफना येथील शेतकरी तथा उपसरपंच संतोष माने यांनी वडिपार्जित जमीन वडिलाच्या मृत्यूनंतर आपल्या नावे होत नसल्याने तहसीलच्या दालनातच केरोसीन अंगावर ओतले होते. यामध्ये ते थोडक्यात बचावले.
तिसरी घटना, कवाना येथील दत्तात्रेय अनंतवार यांचे अंगरक्षक पद काढून घेतले. पोलीस अधीक्षक आयजी गुन्हा अन्वेषण यांच्याविरोधात पुरावे जमा करुन महासंचालकाकडे तक्रारी केल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदविण्यात आले व तक्रारी मागे घेण्यास भाग पाडल्यावरुन त्यांनी मंत्रालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे मनाठा पोलिसांसह जिल्ह्याची पोलीस यंत्रणाही हदरली होती.
११ डिसेंबर रोजी संजय पावडे नावाच्या शेतक-याचे रिकामे ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी ठाण्यात लावले. लाकडे नेल्याचा आरोप त्यांच्यावर होता. गुन्हा न नोंदविता ट्रॅक्टर सोडविण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु, शेतक-यांनी विरोध केला. यावरुन वाद झाला. मग जाचाला कंटाळलेल्या शेतक-याने सोमवारी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला.उपस्थितांनी वेळीच त्यांना अडविले. दोन दिवस हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. लगेच शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून आपली बाजू पोलिसांनी मांडली.
हदगावच्या नगरसेविका विद्या भोस्कर प्रभागातील हातपंप दुरुस्तीची मागणी केली होेती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. शेवटी लेखी हमीपत्र देवून हे प्रकरण मिटविले. याविषयी मनाठा पोलीस ठाण्याचे सपोनि आर. डी. पांचाळ म्हणाले, ट्रॅक्टरवर गुन्हा नोंदवू नये यासाठी त्याने दबाव टाकण्यासाठी हे नाटक केले. त्यांच्या अंगावर विष पडले. ते पोटात गेले नाही.
पोलीस, महसूल प्रशासनाकडून त्रास
- तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच आत्महत्येचे प्रयत्न झाले़
- चोरंबा खुर्द येथील रुद्राजी झुरोळे नावाच्या शेतकºयाला तलाठी सातबारा देत नसल्या- प्रकरणी मनस्ताप झाल्याने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला़
- कवाना येथील दत्तात्रेय अनंतवार यांचे अंगरक्षकपद काढून घेतल्याप्रकरणी त्यांनी मंत्रालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता़
- संजय पावडे या शेतक-याचे रिकामे ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी ठाण्यात लावले होते़ याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला़
- नगरसेविका भोस्कर यांनीही आत्महत्येचा इशारा दिला होता़