सैनिक मारोती राजेमोड यांचे उधमपूर येथे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 03:04 PM2018-10-18T15:04:48+5:302018-10-18T15:06:58+5:30
मारोती कोंडीबा राजेमोड (२८ ) असे मृत सैनिकाचे नाव आहे.
भोकर (नांदेड) : तालुक्यातील पांडूरणा येथील एका सैनिकाचे जम्मू येथील उधमपूर येथे बुधवारी रात्री नैसर्गिक आजाराने निधन झाले. मारोती कोंडीबा राजेमोड (२८ ) असे मृत सैनिकाचे नाव आहे. हे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
मारोती राजेमोड हे दहा वर्षापूर्वी सैन्यात दाखल झाले. सध्या ते ८७४ एडी रेजिमेंट मध्ये उधमपूर (जम्मू) येथे कार्यरत होते. त्यांच्या मागे आई - वडील, भाऊ, दोन बहिणी, पत्नी, ४ वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
जम्मूच्या उधमपूर मध्ये सैनिक मारोती राजेमोड पत्नी प्रतिभा, मुलगा व मुलगी अशा परिवारासह रहात होते. बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान आजाराने नैसर्गिक निधन झाल्याची माहिती प्रशासनाने नातेवाईकांना दिली. यावरून पांडूरणा येथील त्यांचे नातेवाईक हैदराबाद येथून विमानाने पार्थिव आणण्यासाठी रवाना झाले आहेत.