सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:18+5:302021-05-23T04:17:18+5:30
नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, ...
नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे उत्पादनात घट व बाजरात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले. मात्र, जिल्ह्यास महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आव कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यात बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहिल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबनीची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.
विकलं नसंत तर परवडलं असतं!
सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसंत तर परवडलं असंत राव ! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना अशा प्रतिक्रिया व्यक्त कर आहेत.नांदेड- कधी नव्हे ते सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा दुप्पट भाव मिळत असून दरदिवसाला होत असलेली दरवाढ लक्षात घेता आठ हजार रुपयाकडे सोयाबीनीची वाटचाल होताना दिसत आहे.
नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे उत्पादनात घट व बाजरात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले. मात्र, जिल्ह्यास महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आव कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यात बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहिल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबनीची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.
चौकट......
विकलं नसंत तर परवडलं असतं!
सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसंत तर परवडलं असंत राव ! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना अशा प्रतिक्रिया व्यक्त कर आहेत.