कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे ९ ते १२ चे रेग्युलर वर्ग चालू करण्यात आले. आता शालेय शिक्षण विभागाने देखील ५ वी ते ८ वी चे वर्ग २७ जानेवारी पासून रेग्युलर चालू करण्यासंदर्भात राज्यातील सर्व शाळांना आदेश दिले आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय चालू करण्यासंदर्भात २० जानेवारी रोजी भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले होते. परंतु दोन दिवस झाले तरी यावर निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय चालू करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी केली. अन्यथा १ फेब्रुवारी आंदोलन करण्याचा ईशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.
विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय चालू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:17 AM