ऑनलाइन सभा घेण्यास जोरदार विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:51+5:302021-07-07T04:22:51+5:30

छावाची नायगाव तालुका कार्यकारिणी जाहीर नायगाव : छावा संघटनेची विद्यार्थी आघाडी कार्यकारिणी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील यांनी जाहीर केली. कार्यकारिणीत ...

Strong opposition to online meetings | ऑनलाइन सभा घेण्यास जोरदार विरोध

ऑनलाइन सभा घेण्यास जोरदार विरोध

googlenewsNext

छावाची नायगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

नायगाव : छावा संघटनेची विद्यार्थी आघाडी कार्यकारिणी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील यांनी जाहीर केली. कार्यकारिणीत - उपाध्यक्ष आकाश कल्याण, तालुका सरचिटणीस गोपाळ ढगे, कार्याध्यक्ष योगेश शिंदे, उपाध्यक्ष सचिन कदम, संघटक दत्ताहरी मिसाळ, शाखाध्यक्ष नागनाथ सूर्यवंशी, शाखा उपाध्यक्ष मेळगाव- पवन शिंदे, तालुका संपर्कप्रमुख गणेश जाधव.

मुख्याध्यापकपदी वैद्य

बोधडी : सिंगारवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकपदी वैद्य यांची नियुक्ती झाली. याअगोदरचे दराडे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. दरम्यान, शिक्षण समितीचे अध्यक्ष भारत जाधव, सुधाकर कदम, सुभाष पोटे, दिगंबर कदम, सतीश जमादार, मोरे, राठोड, बंडेवार, जयस्वाल, नबी सर आदींनी वैद्य यांचे स्वागत केले.

दगड उत्खनन; बोअर ब्लास्टिंग

हदगाव : तालुक्यातील मौजे दगडवाडी येथे उत्खनन व बोअर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, १४ जुलै रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सदर प्रकार थांबवावा या मागणीसाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक कारवाई

लोहा : तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंतेश्वर व टेळकी येथील चार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तपास जमादार साखरे करीत आहेत.

अमरनाथ कांबळे यांची निवड

बिलोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शहराध्यक्षपदी अमरनाथ कांबळे यांची निवड झाली. पंचायत समिती सभापती यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. या नियुक्तीबद्दल कांबळे यांचे अनेकांनी स्वागत केले.

प्राचार्यपदी कांबळे

बोधडी : येथील अंध विद्यालयाचे प्राचार्य म्हणून व्ही.के. कांबळे यांनी पदभार स्वीकारला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेश टारपे, उपाध्यक्ष गंगाधर चव्हाण, सहसचिव नंदिनी टारपे, संजय पांडे, शंकर फोले यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रमोद सुकळे सेवानिवृत्त

हिमायतनगर : येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद सुकळे सेवानिवृत्त झाल्याने शिक्षकांच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Strong opposition to online meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.