तेलंगणा-महाराष्ट्र सीमेलगत वाहनांची कडक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:35 AM2019-03-20T00:35:13+5:302019-03-20T00:36:15+5:30
तालुक्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी १७ मार्च रोजी मध्यरात्री तेलंगणा-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या कार्ला फाटा व नागणी येथे लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताठिकाणी भेटी देवून योग्य त्या सूचना केल्या आहेत.
बिलोली : तालुक्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी १७ मार्च रोजी मध्यरात्री तेलंगणा-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या कार्ला फाटा व नागणी येथे लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताठिकाणी भेटी देवून योग्य त्या सूचना केल्या आहेत.
आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन, कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाणार नाही़ तसेच सार्वजनिक ठिकाणी राजकीय जाहिराती फलक, मजकूर, झेंडे आदी लावली जाणार नाही़ आदींवर पोलिसांनी करडी नजर ठेवून तसा अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयाला सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. तर निवडणूक कालावधीत परप्रांतातून अवैध दारु, पैसा, निवणुकीला बाधा आणणारे साहित्य आदींची आवक होऊ नये यासाठी बिलोली तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या नागणी व कार्ला फाटा या दोन ठिकाणी १२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिवसरात्र तपासणी बंदोबस्त नाका उभारण्यात आला असून या यंत्रणेकडून तेलंगाणा-महाराष्ट्र ये-जा करणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असून आचारसंहितेचा भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव म्हणाले.