आज दोन्ही गटातून नागरिकांना दुसरी लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:03+5:302021-06-16T04:25:03+5:30

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ११ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रांत श्री गुरूगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव ...

Today a second vaccine to citizens from both groups | आज दोन्ही गटातून नागरिकांना दुसरी लस

आज दोन्ही गटातून नागरिकांना दुसरी लस

Next

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ११ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रांत श्री गुरूगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा हॉस्पिटल, श्रावस्तीनगर व सिडको या दहा केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. त्यात कोविशिल्डचा डोस प्राधान्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी वापरला जाईल. त्याचवेळी कोव्हॅक्सिन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरूगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको या केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस दिले आहेत. शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रांमध्ये उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव व उमरी या १६ केंद्रांवर कोविशिल्डचे १०० डोस केंद्रनिहाय उपलब्ध आहेत. ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस येथे उपलब्ध करून दिला जाणार हेआ.

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून दिली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी १५० डोस उपलब्ध करून दिले आहेत, तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे कोव्हॅक्सिन लसीचे ५० डोस उपलब्ध आहेत. दुसऱ्या डोससाठीच प्राधान्याने ते वापरले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील लसीकरणासाठी कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. ते डोसही दुसऱ्या डोससाठी प्राधान्याने वापरले जातील.

चौकट

----------------

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ६६ हजार ६८ नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे ४ लाख ३८ हजार २३० आणि कोव्हॅक्सिनचे १ लाख ४१ हजार ९४० डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरणाचे नियोजन केले जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Today a second vaccine to citizens from both groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.