सामाजिक वनीकरणअंतर्गत गडगा परिसरात वृक्षलागवडीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:59 AM2019-07-14T00:59:52+5:302019-07-14T01:01:49+5:30

सामाजिक वनीकरणअंतर्गत वृक्षारोपणासाठी मे महिन्यात नरसी-मुखेड रस्त्याच्या दुतर्फा अर्ध्याहून कमी खोदलेल्या खड्ड्यात झाडे लावण्यात आली़ विशेष म्हणजे, पुरेसा पाऊस झाला नसून त्यामुळे जमिनीत ओलावाही नाही़ अशा स्थितीत लावलेल्या झाडांनी काही दिवसांतच माना टाकल्या आहेत़

Tree forest in Gadag area under social forestry | सामाजिक वनीकरणअंतर्गत गडगा परिसरात वृक्षलागवडीचा फार्स

सामाजिक वनीकरणअंतर्गत गडगा परिसरात वृक्षलागवडीचा फार्स

Next
ठळक मुद्देअर्धेच खोदले खड्डे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे रोपांनी टाकल्या माना

गडगा : सामाजिक वनीकरणअंतर्गत वृक्षारोपणासाठी मे महिन्यात नरसी-मुखेड रस्त्याच्या दुतर्फा अर्ध्याहून कमी खोदलेल्या खड्ड्यात झाडे लावण्यात आली़ विशेष म्हणजे, पुरेसा पाऊस झाला नसून त्यामुळे जमिनीत ओलावाही नाही़ अशा स्थितीत लावलेल्या झाडांनी काही दिवसांतच माना टाकल्या आहेत़ त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच वृक्षारोपणाचा फार्स सुरु असल्याचे दिसून येत आहे़ यामध्ये शासनाचे कोट्यवधी रुपये मात्र पाण्यात जात आहेत़
सामाजिक वनीकरणअंतर्गत नायगाव तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा, कालवा दुतर्फा, जलयुक्त शिवार क्षेत्रात रस्ता दुतर्फामध्ये नरसी ते रातोळी भाग १ क्रमांक भागात तसेच रातोळी ते नरसी भाग क्रमांक २ मध्ये वृक्षारोपण प्रस्तावित आहे. कुष्णूर टोलनाका ते पाटोदा, घुंगराळा ते बळेगाव, परडवाडी ते सांगवी, किनाळा हिप्परगा ते मुगाव याप्रमाणे तसेच कालवा दुतर्फामध्ये टाकळगाव ते तलबीड सालेगाव ते छत्री शेळगाव, रातोळी तांडा ते टेंभूर्णी असे आहे. जलयुक्त शिवारातील नायगाववाडी ते कोलंबी, बरबडा ते अंतरगाव, उमरा पाटी ते वजिरगाव, बरबडा ते मनूर यापद्धतीने वृक्षारोपण करण्यासाठी मे महिन्यात खड्डे खोदले खरे परंतु खड्ड्याच्या मापात पाप केल्याचे दिसून येत आहे़ खड्डे खोदण्यापासून ते वृक्षारोपणाच्या स्थानिक मजुरांना डावलण्यात आल्याचाही आरोप होत आहे़ पावसाळा सुरू झाला असला तरी अजूनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही़ परिणामी शेतकऱ्यांनी केलेली पेरणीच संकटात आहे.
पावसाच्या विश्रांतीमुळे जमिनीत ओलावाच राहिला नाही़ या स्थितीत सामाजिक वनीकरणने चालविलेली वृक्षारोपण मोहीम संकटात सापडली आहे. वृक्षारोपण केलेले रोपटे लागलीच कोमेजून माना टाकून देत आहेत़ त्यामुळे या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत़ वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्हाभरात करण्यात आलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरज आहे़
लावलेल्या झाडांना टँकरने पाणी पुरविणार
जुलै ते सप्टेंबर महिन्यात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. सप्टेंबरमध्ये वनमहोत्सव साजरा केला जातो. सध्या जिथे पाऊस नाही अशा ठिकाणी वृक्षारोपण काम थांबविले आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले तेथे टँकरने पाणी टाकण्यात येईल. काम व्यवस्थित झाले का नाही?मजुरी किती दिली जाते? ते कशाप्रकारे काम करतात? याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी तेथील कर्मचाऱ्यांची आहे. माझ्याकडे तीन तालुक्यांचा कार्यभार असून अनेक बैठका असतात़ त्यामुळे कर्मचाºयांनी व्यवस्थित काम करावे, अशी प्रतिक्रिया वनक्षेत्रपाल अश्विनी जाधव यांनी दिली़

Web Title: Tree forest in Gadag area under social forestry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.