नांदेड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी दोन अर्ज दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:46 PM2019-05-30T17:46:30+5:302019-05-30T17:48:40+5:30

महापालिकेत काँग्रेसचे ८१ पैकी ७४ नगरसेवक आहेत़

Two applications for Mayor post of Nanded Municipal Corporation | नांदेड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी दोन अर्ज दाखल 

नांदेड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी दोन अर्ज दाखल 

Next

नांदेड : नांदेडच्या महापौर पदासाठी दोन अर्ज आले असून काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले आणि भाजपाच्या बेबीताई गुपिले यांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता़ महापालिकेतील संख्याबळ पाहता दीक्षा धबाले यांची महापौरपदी निवड निश्चित आहे़

नांदेड महापालिकेच्या महापौर शीलाताई भवरे यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला होता़ या रिक्त पदाची माहिती विभागीय आयुक्तांना दिल्यानंतर महापौर निवडीचा कार्यक्रम २८ मे रोजी घोषित करण्यात आला़ त्यानुसार १ जून रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा होईल़ ३० मे च्या दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती़ महापौर पदासाठी काँग्रेसच्या दीक्षा धबाले यांनी तर भाजपाकडून बेबीताई गुपिले यांनी अर्ज भरला आहे़

महापालिकेत काँग्रेसचे ८१ पैकी ७४ नगरसेवक आहेत़ भाजपाचे ६, शिवसेना १ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे़ या संख्याबळाच्या आधारे ही निवडणूक काँग्रेस एकतर्फी जिंकेल, असेच चित्र आहे़ महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे़ काँग्रेसने महापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फार्म्युला निश्चित केला होता़ या फार्म्युलानुसार शीलाताई भवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़ त्यांना जवळपास १७ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला़ आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि उर्वरित कालावधी पाहता नव्या महापौरांना केवळ १० महिने या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे़ 

Web Title: Two applications for Mayor post of Nanded Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.