- अविनाश पाईकराव
नांदेड: शहरात बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, स्थानिक गुन्हा शाखेन शहरातून गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतूस देखील जप्त करण्यात आली.
११ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनूसार शहरातील तांडा बार समोर एक तसेच भगवान बाबा चौक येथे एक संशयित स्वतःचे जवळ पिस्टल बाळगुन असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थागुशाचे अधिकारी व अमलदारांचे दोन पथक सदर ठिकाणी रवाना केले. यावेळी तांडा बार समोर संशयीतरीत्या उभा असलेल्या आरोपी अर्जुन राधेश्याम शर्मा (वय ३१, रा. जुना मोंढा नांदेड) यास पकडुन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावटी पिस्टल, तिन जिवंत काडतुस मिळाले. तसेच स्थागुशाचे दुसऱ्या पथकाने भगवान बाबा चौक येथून आरोपी गणेश केरवा बोधले (वय ३२, रा. भगवान बाबा चौक, नांदेड) याच्याकडून एक गावटी पिस्टल व तिन जिवंत काडतुस जप्त केले. दोन्ही आरोपीविरुध्द वजीराबाद व नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सपोउपनि माधव केंद्रे, पोह सुरेश घुगे, पोकॉ मोतीराम पवार, तानाजी येळगे, रणधीर राजबन्सी, विलास कदम, गणेश धुमाळ, महेश बडगु, ज्वालासिंग बावरी, गजानन बयनवाड, पोकॉ हेमंत बिचकेवार, सायबर सेलचे दिपक ओढणे यांनी केली.