चारित्र्यावर संशय घेवून मारहाण
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करण्यात आली. तसेच माहेराहून पाच लाख रुपये घेवून येण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात शिशूपाल मारोतराव वाघमारे, माराेतराव वाघमारे, सुजाता हनवते, अशोक हनवते यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ऑटोचालकाने केली वाहकाला मारहाण
देगलूर येथील नवीन बसस्थानक परिसरात ऑटो चालकाने बसच्या वाहकाला मारहाण केली. ही घटना १५फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणात देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तुकाराम एकनाथ बिरादार हे बस घेवून बसस्थानक परिसरात आलेले असताना ऑटाेचालकाने त्यांचा रस्ता अडविला. यावेळी बिरादार यांनी वाहकाला ऑटो काढण्यास सांगितले. त्यावरुन चिडलेल्या ऑटोचालक अबुबकर शहाबुद्दीन आणि त्याच्या भावाने बिरादार यांना मारहाण केली.