लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : ‘‘बेटी बचाओ आणि बेटी पढाओ’’ म्हणणाऱ्या लोकांची प्रवृत्ती काय आहे, या लोकांपासूनच ‘बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आज त्यामुळे महिला भगिनींचे भवितव्य व मुलींचे भवितव्य धोक्यामध्ये आले आहे, हे आपण पाहतोय. याशिवाय, अशा या राज्यकर्त्यांचे पुरस्कर्ते सद्या वाढले आहेत, त्यांचे दहन करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.नवीन नांदेड परिसरात १८ आॅक्टोबर रोजी रात्री आठ वाजता माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांच्या रावण दहनाचा कार्यकम पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते.खा. चव्हाण म्हणाले, रावणाच्या अपप्रवृत्तीला दहन करण्याची भावना तमाम लोकांची आहे. रावण दहन हे एक अपप्रवृत्तीचे प्रतिक आहे. आज राज्यात व केंद्रात असलेल्या ‘रावण’ रूपी अपप्रवृतीचे दहन करण्याकरिता आपण सर्वांनी एकत्र आला आहोत, असे नमूद करून सर्वांच्या प्रयत्नातून नांदेडचा चेहरा- मोहरा बदलून टाकू, अशी स्पष्ट ग्वाही उपस्थितांना दिली.शेतकºयांच्या आत्महत्याही थांबल्या पाहिजेत, आणि जेवढया अपप्रवृत्ती आहेतया अपप्रवृत्तीला जाळता आले पाहिजे अशी भावना सर्वसामान्यांच्या मनामध्ये कायम आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.सिडकोवासियांनी आम्हाला मोठी साथ दिली, त्यामुळे सिडकोच्या विकासासाठी प्रयत्न करु,असे चव्हाण आवर्जुन म्हणाले. याप्रसंगी आ. राजूरकर तसेच आ. सांवत यांनी आपापल्या मनोगताद्वारे विनय गिरडे पाटील यांचे व त्यांच्या सहकारी मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रावण दहन या कार्यक्रमाचे कौतुक केले.यावेळी मंचावर महापौर शिलाताई किशोर भवरे, आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, उमेश पवळे, स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक किशोर स्वामी, श्रीनिवास जाधव, राजू काळे व विजय येवनकर यांच्यासह नगरसेविका दिपाली मोरे, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, जि. प. सदस्य मनोहरराव शिंदे, विठ्ठल पावडे, उदय देशमुख, सिद्धार्थ गायकवाड व माजी नगरसेवक संजय मोरे, संजय इंगेवाड, माजी नगरसेविका प्रा. ललिता शिंदे, डॉ. करूणा जमदाडे, किशोर भवरे व रंगनाथ भुजबळ आदींची उपस्थिती होती.प्रास्ताविक संयोजक तथा उपमहापौर विनय गिरडे पाटील यांनी केले. बालाजीराव गवाले यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.प्रांरभी, खा. चव्हाण यांच्या हस्ते सिडको परिसरातील रमाई आंबेडकर चौक ते वसंतराव नाईक कॉलेजच्या जुन्या इमातीपर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरूस्ती अर्थातच डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.दरम्यान, रावणदहन कार्यक्रमाला सिडको व हडको परिसरातील हजारो पुरूष व महिलांची गर्दी झाली होती.
मुली, महिलांसाठी देशात असुरक्षित वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:28 PM
‘‘बेटी बचाओ आणि बेटी पढाओ’’ म्हणणाऱ्या लोकांची प्रवृत्ती काय आहे, या लोकांपासूनच ‘बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आज त्यामुळे महिला भगिनींचे भवितव्य व मुलींचे भवितव्य धोक्यामध्ये आले आहे, हे आपण पाहतोय. याशिवाय, अशा या राज्यकर्त्यांचे पुरस्कर्ते सद्या वाढले आहेत, त्यांचे दहन करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांचे प्रतिपादन