गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:25+5:302021-02-05T06:08:25+5:30
सतीश खानसोळे यांचा सन्मान हदगाव - तालुका कृषी कार्यालयातील कृषी विकास अधिकारी सतीश खानसोळे यांनी कृषी कार्यालयात उल्लेखनीय कार्य ...
सतीश खानसोळे यांचा सन्मान
हदगाव - तालुका कृषी कार्यालयातील कृषी विकास अधिकारी सतीश खानसोळे यांनी कृषी कार्यालयात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्राद्वारे सन्मानित करण्यात आले. आ.जवळगावकर, उपविभागीय अधिकारी दिगंबर तपासकर, जीवराज डापकर, राजकुमार रणवीर, नायब तहसीलदार गोपाळराव हराळे, बीडीओ केशव गड्डापोड, गटशिक्षणाधिकारी के.व्ही. फोले, कृषी अधिकारी लहाने आदी उपस्थित होते.
चिखलीकर यांच्याकडून सांत्वन
नायगाव - तालुक्यातील मुगाव येथे भाजपचे कार्यकर्ते धोंडिबा फत्ते यांचे हृदयविकाराने निधन झाले. खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुगाव येथे जावून फत्ते कुटुंबाची भेट घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील, अशोक पाटील, बाबूराव लंगडापुरे, नगरसेवक देवीदास बोमनाळे, धनराज, शिराळे, सय्यद जाफर आदी उपस्थित होते.
मुंडकर यांचा सत्कार
बिलोली - ग्रामपंचायत निवडणुकीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनी काही कोतवालांचा प्रशस्तिपत्र व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. कोल्हेबोरगाव येथील कोतवाल शिवराज मुंडकर यांचा न्या. विक्रमादित्य मांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार कैलास वाघमारे, बीडीओ नाईक, नायब तहसीलदार गौंड, चव्हाण, परळीकर उपस्थित होते.
कोरोना जनजागृती
नायगाव - नायगाव तालुक्यात ठिकठिकाणी कोरोना जनजागृतीचे कार्यक्रम पार पडले. शाहीर बळिराम पाटील यांनी जनजागृती केली. नायगाव, नरसी, बरबडा, काेलंबी, कुंटूर, गडगा, घुंगराळा, कहाळा, शेळगाव, मांजरम आदी ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम पार पडले.
विद्यार्थ्यांचा सत्कार
हदगाव - तळणी जि. प. कें. प्रा. शाळेतील विद्यार्थी युवराज गुलाबराव तावडे हा ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात पाचवा आला. त्याची अमरावती विद्यानिकेतन येथे प्रवेशासाठी निवड झाली. याबद्दल प्रजासत्ताक दिनी जि. प. सदस्य मारोतराव लोखंडे, शा. व्य. स. चे अध्यक्ष संतोषराव तावडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बाबूराव तावडे, मंडळ अधिकारी गिरी, तलाठी वडकुते, पो. पा. उद्धवराव सूर्यवंशी, मुख्याध्यापक वाघमारे, तावडे, राऊत आदी उपस्थित होते.
लोहबंदे सेवानिवृत्त
धर्माबाद - येथील आयटीआयमधील कर्मचारी गंगाधर लोहबंदे ३१ जानेवारीला निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा ३० रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य एस. एस. परघणे, गटनिदेशक जी. एस. नवसागरे, आर. टी. मारकवाड, शिल्पनिदेशक ए. जी. कुलकर्णी, लेखापाल एस. एम. परळे, गिरी, आरेवार, एम. डी. जोंधळे, जे.के. जोंधळे, गंगाधर जारीकोटकर, गंगाधर वाघमारे, दिगंबर वाघमारे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
मुखेड - तालुक्यातील सांगवी बेनक येथील आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. पृथ्वीदास पत्की यांच्यावतीने जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विजयकुमार मस्कले, रमेश मस्कले, गजानन पत्की, श्याम मस्कले, माधव वारे, चंद्रकांत डोंगरे, मुख्याध्यापक माधव सिद्धेश्वर आदी उपस्थित होते.
ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार
भोकर - सोमठाणा येथील जि.प. शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्यावतीने नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शा. व्य. स. चे अध्यक्ष ओमप्रकाश तिवारी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच पांडुरंग चिकटे, प्रकाश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामराव चिकटे, गजानन हाके, विक्रीकर अधिकारी पंकज हाके, वैद्यकीय अधिकारी डॉ.खान, पांडुरंग गोरटकर आदी उपस्थित होते.