राजेश वाघमारे ।भोकर : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्यातील तालुक्यांची निवड करण्यात आली़ २४ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे.राज्याच्या जलसमृद्धीचा प्रवास अखंड सुरू राहण्यासाठी पाणी फाऊंडेशनने निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांना आमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी गावांची निवड केली़८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रूपये ५० लाख रूपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणा-या गावांना देण्यात येणा-या एकूण बक्षिसांची रक्कम ९.१५ कोटी राहणार आहे. स्पर्धेतंर्गत पानी फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यावर्षी परत पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा २०१९ साठी तालुक्याची निवड करण्यात आली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक गावे सरसावली आहेत. यासाठी जानेवारीअखेर ते मार्चमध्ये पाणी बचतीच्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रत्यक्ष स्पर्धेला ८ एप्रिलपासून सुरुवात होवून २२ मे रोजी स्पर्धा संपणार आहे. दरम्यान, तालुका समन्वय सुगंध पळसे व गजानन वाहूळकर यांच्यासह महसूल, कृषी, वनविभाग आणि पंचायत समिती स्तरावर प्रशासन सहकार्य करणार आहे.या स्पर्धेत तालुक्यातील हाडोळी गावाने प्रथम क्रमांक मिळवून पानी फाऊंडेशनचे १० लाख व महाराष्ट्र शासनाचे ५ लाख असे एकूण १५ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकाच्या दिवशी खु.गावाला महाराष्ट्र शासनाचे ५ लाख मिळाले तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या वाकद गावाला ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते.४५ दिवसांचा कालावधी४५ दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत 'श्रमदान', पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील.ज्यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्यांतील प्रत्येक महसुली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे. पहिल्या विजेत्या तीन गावांना ७५ लाख, ५० लाख व ४० लाख रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
वॉटर कप २०१९ स्पर्धेत भोकर, लोह्याचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:50 AM
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़
ठळक मुद्दे८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होणार स्पर्धा