महिलेची दागिन्यांची बॅग पळविणारा चोरटा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:10 AM2019-02-13T01:10:12+5:302019-02-13T01:10:34+5:30
शहरातील डी मार्टजवळ रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २४ हजार रुपये असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला होता़
नांदेड : शहरातील डी मार्टजवळ रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २४ हजार रुपये असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला होता़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका चोरट्याचा मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरीतील दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांनी दिली़
सागरा रमेश जलावार (रा़भैसा) या नांदेडात नातेवाईकांकडे आल्या होत्या़ २१ जानेवारी रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास डी-मार्ट येथे खरेदीनंतर रिक्षात बसून त्या घरी जात होत्या़ त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला़
या बॅगमध्ये पाच तोळे सोने आणि रोख २४ हजार रुपये होते़ या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यात स्थागुशाच्या पथकाला या चोरट्याची माहिती मिळताच माळटेकडी परिसरात विनाक्रमांकाच्या पल्सरवरुन जाणाºया शेख सलीम शेख अब्दुल रज्जाक रा़शिवनगर याला पोलिसांनी पकडले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने ८२ हजार रुपयांचे दागिने आणि पल्सर दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली़ ही पल्सर दुचाकी आरोपीने सहयोगनगर येथून चोरली होती़ या प्रकरणात शेख सलीम याचा साथीदार बाळू रा़लक्ष्मीनगर हा फरार आहे़
शेख सलीम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उपाधीक्षक फस्के म्हणाले़ पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे, पोनि़ सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी़डी़भारती, पोउपनि नेहरकर, गायकवाड, शेख अलीम, बालाजी बोडखे, बडगुलवार, शेख जावेद, ब्रम्हानंद लामतूरे, श्याम नागरगोजे, गंगूलवार, फुलारी, श्रीरामे, शेख कलीम यांनी कारवाई केली़