महिलांनी निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हावे - प्रा.इरवंत सुर्यकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:32 AM2021-03-13T04:32:23+5:302021-03-13T04:32:23+5:30
यावेळी इरवंत सुर्यकार म्क्रांहणाले की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून महिलांवर अनंत उपकार केले, सावित्रीबाई ...
यावेळी इरवंत सुर्यकार म्क्रांहणाले की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून महिलांवर अनंत उपकार केले, सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, माता रमाई, अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊन महिलांनी मार्गक्रमण करावे. आज महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत यातून महिलां निश्चितच सबला बनतील आणि म्हणून महिलांचा निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा लागेल , महिला ह्या कर्मकांडात न गुंफून राहता विज्ञानाची कास धरावी म्हणजे विवेकशील विज्ञाननिष्ठ बनण्यास बळ मिळेल. या प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या व्यवस्थापक प्रणिता जाधव, उड्डाण महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष वर्षा आवतिरक, सचिव जैनूबी शहाबुद्दीन कोटांगले ,कोषाध्यक्ष प्रज्ञा भोसीकर , गोदावरी गिजे, वर्षा गुंडले, विशाखा सोनसळे, पुष्पा देशमुख आदी उपस्थित होत्या.
यावेळी शेख हिना शेख मुक्तार यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन पुष्पा चातरवार तर आभार प्रज्ञा भोसीकर यांनी मानले.