११५ मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह महिलांची रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:43 AM2019-03-09T00:43:10+5:302019-03-09T00:43:34+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त पुलवामा येथील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महिलांचा सलाम म्हणून ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून सद्भावना रॅलीचे आयोजन येथील महिलांनी केले होते.

Women's rally with 115 meter long tricolor flag | ११५ मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह महिलांची रॅली

११५ मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह महिलांची रॅली

googlenewsNext

हदगाव : जागतिक महिला दिनानिमित्त पुलवामा येथील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महिलांचा सलाम म्हणून ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून सद्भावना रॅलीचे आयोजन येथील महिलांनी केले होते.
या रॅलीमध्ये शहरातील असंख्य महिला व तरुणींनी सहभाग नोंदविला. भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिला शक्तीचे दर्शन हदगावकरांना घडविले असल्याचे बोलके चित्र पहावयास मिळाले. यात पतंजली योगपीठ समितीच्या सदस्या सपना तोष्णीवाल, जिजाऊ ब्रिगेडच्या वर्षा देशमुख, आर्य वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभावती व्यवहारे, महिला दक्षता समिती नांदेडच्या सदस्य बशारत बेगम, डॉ.स्वप्ना कवटीकवार डॉ.जयश्री पवार, डॉ.सविता मामीडवार, वैशाली मामीडवार, राधिका तुप्तेवार, सुवर्णा तोष्णीवाल, मंदा पत्तेवार, संध्या दमकोंडवार, दीपा बलदवा, नीलिमा बलदवा, आरती बलदवा, निशा लाहोटी, वैशाली राऊळ यांच्यासह असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला़

  • शहरातील राखी चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली़ शहरात फिरुन रॅली राठी चौकात समारोप झाला़ या समारोपाप्रसंगी महिला दक्षता समितीच्या सदस्य बशारत बेगम यांनी मनोगत व्यक्त केले़
  • रॅलीत महिलांसह विद्यार्थिनींनीही आपला सहभाग नोंदवला होता़ शुक्रवार हा हदगाव बाजाराचा दिवस असल्याने आजूबाजूच्या खेड्यांतील महिलांनीसुद्धा यात आपला सहभाग नोंदवला़ रॅलीत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश गायके, गोपनीय शाखेचे पप्पू चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़

Web Title: Women's rally with 115 meter long tricolor flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.