चव्हाण म्हणाले आसना नदीवरील नवीन पूल स्व. विलासराव देशमुख यांनी मंजूर केला होता. तो पूल झाल्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होत आहे. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार आले. त्या काळात मराठवाड्यातील विकास कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मराठवाड्यातील कोणत्याही विकास कामांसाठी तत्काळ निधी मंजूर केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात कुठलेही विकासात्मक काम पुढे आले की सर्व प्रथम अधिकाऱ्यांना नांदेडच्या विकासात्मक कामांचा समावेश असेल तरच फाईलवर सही करेन. त्यानंतर निधी उपलब्ध केला जाईल असे स्पष्ट आदेश आमच्या खात्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. निळा ते नांदेड मार्ग बासर हा १०० किमीचा नवीन महामार्ग आमच्या विचाराधीन आहे. शिव मंदिर-तरोडा-शेलगाव- दाभड हा ११ किमीचा नवीन रस्त्याचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. नांदेड शहरातील २२ ते २५ किमी. रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार आहोत. तसेच नगर विकासकडूनही २०० ते २५० काेटींचा निधी खेचून आणण्याचा प्रयत्न आहे.देगलूर नाका परिसरातील गर्दी कमी व्हावी यासाठी बाफना टि पॉईंट ते सूत गिरणीपर्यंत उड्डाण पूल उभारण्यासाठी चाचपणी सुरु आहे.केवळ मुदखेड नव्हे तर संबंध जिल्हाभर विकास निधी देण्यात येणार आहे.
चौकट.......
राजकारण निवडणूक पुरतेच करणे योग्य
निवडणुकीपुरते राजकारण करणे योग्य आहे. इतरवेळी माझे नांदेड कसे सर्वांगीण सुंदर होईल यासाठी पक्षपात न करता सर्वांनी विकास कामे करण्यावर भर द्यावा. सध्या जिल्हाभरात हजारो कोंटीची कामे सुरु आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांचे श्रेय काही मंडळींनी लाटू नये यासाठी शासकीय स्तरावर आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.