नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:46 AM2019-03-09T00:46:36+5:302019-03-09T00:47:13+5:30

पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़

World women's day celebrated by various activities in Nanded district | नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा

नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा

Next
ठळक मुद्देकर्तबगार महिलांचा गौरव : शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्रम उत्साहात


नांदेड : जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला़ पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़ तसेच मार्गदर्शन मेळावे, आरोग्य शिबीर, कायदेविषयक शिबीर घेण्यात आले़ शाळा, महाविद्यालयांत महिला दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले़ तर काही ठिकाणी रॅली काढून महिलांविषयी सामाजिक संदेश देण्यात आला़ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले़
माहुरात महिलांचा सन्मान
श्रीक्षेत्र माहूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माहूर तहसील कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला़ तहसील कार्यालयाकडून विशेष संदेश, व्हीव्हीपॅट मशीसची माहिती देत उपस्थित महिला भगिनींचा साडी व भेटवस्तू देवून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
तहसीलदार यांच्या दालनात पार पडलेल्या कार्यक्रमात विद्या सुरंगवाड, पद्मा आनंदराव निलगीरवार, शाहीन शेख नबी, नैना मेश्राम, ऋतुजा गिºहे व पत्रकार पद्मजा जयंत गिºहे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उत्तम कागणे, व्यंकट जळमकर, जमीरोद्दीन सिद्दीकी, अमोल वाघाडे, प्रभू पातोडे, रेणुकादास आठवले, खिल्लारे, बी.एल.काळे, विष्णू राजूरवार, पाईकराव, राजेश राठोड, राज मेश्राम आदी उपस्थित होते.
उमरीत बचत गटांना निधी वाटप
उमरी : जागतिक महिला दिनानिमित्त उमरी नगर परिषदेच्या वतीने शहरातील बचत गटांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातील दोन महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा फिरता निधी नगराध्यक्षा अनुराधा खांडरे व दीपाली मामीडवार यांच्या हस्ते देण्यात आला. ग्रामीण रूग्णालयातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी महिलांची आरोग्य तपासणी करुन औषधी वाटप करण्यात आले. मुख्यधिकारी काकासाहेब डोईफोडे, माजी नगराध्यक्ष राजेश देशमुख तळेगावकर, प्रवीण सारडा, नगरसेवक साईनाथ जमदाडे, डॉ.अर्जुन शिंदे, डॉ.शिल्पा भडांगे, आरोग्यसेविका पांचाळ, हमीद अन्सारी, सहा. प्र.अ.गायकवाड, एस.एन. कोठेकर, सचिन गंगासागरे, श्रीनिवास अनंतवार, गणेश मदने, चंद्रकांत श्रीकांबळे, माधव जाधव, मुदिराज, संगीता हेमके, रमाबाई काटोळे, धुरपतबाई करपे, बचतगट प्रेरक मायादेवी सवई आदी उपस्थित होते़
ग्रामीण ठाण्यात महिलांचा सत्कार
नवीन नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महिला पोलीस अधिकारी व ठाण्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या महिला ‘दक्षता’ समितीच्या सरिता बैस, नीलावती जोगदंड व शे. हसीनाबेगम यांच्यासह शे. रिहानाबेगम व निकिता शहापूरवाड यांची उपस्थिती होती. प्रांरभी, मान्यवरांच्या हस्ते पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पोउपनि. रोहिणी नाबते व महिला पो.कॉ.रागिणी सूर्यवंशी, सरिता बैस यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महिला पोउपनि. स्वाती के. कावळे आणि पोउपनि. सोनाली ए. कदम, पो.कॉ.संगीता चौधरी, संगीता गुरूपवार, महिला पो.कॉ. मीनाक्षी हासरगोंडे, रोहिणी सूर्यवंशी, वर्षा कदम, रागिणी सूर्यवंशी व त्यांच्या सर्व महिला सहकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी नाईक पो. कॉ. संजय जाधव यांनी परिश्रम घेतले.

Web Title: World women's day celebrated by various activities in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.