महिलांची ग्रामसभा
कंधार - तालुक्यातील मरशिवणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपसरपंच कौशल्याबाई लुंगारे तरप्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य वैजनाथ गिरी, रामचंद्र होनराव, गुणाजी लुंगारे यांची उपस्थिती होती. यावेळी नंदा अलवणे, रेखा बडवे, सरिता बोरकर, मंगलबाई भुरे, वर्षा लुंगारे, अनुराधा होनराव, सपना भुरे, स्वाती लुंगारे, मुक्ताबाई ढवळे, सारजाबाई वाघमारे आदी उपस्थित होते.
वृद्धाश्रमात जनजागृती कार्यक्रम
किनवट - जागतिक महिला दिनानिमित्त संथागार वृद्धाश्रमात विविध विषयावर जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी केले. यावेळी ॲड.प्रियंका कैवारे, अतुल बेळीकर यांनी मार्गदर्शन केले. ॲड.दीपा सोनकांबळे, ॲड.सुनयना गेडाम यांनी कायद्याची माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप स्मीता पहूरकर यांनी केला.
शिवीगाळ प्रकरणी गुन्हा
भोकर - तालुक्यातील किनी येथे अश्लील शिवीगाळ करून मारहाणीची घटना ९ मार्च रोजी घडली भोकर पोलिसात रवि पत्नी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवीन रेड्डी मामीडवाड यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
अशोक वाघमारे सेवानिवृत्त
मुखेड - कबनूर येथील अशोक वाघमारे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक आत्माराम देशमुख, माजी मुख्याध्यापक बालाजी वडजे, सुभाष देशमुख, सरपंच कमळबाई वाघमारे, श्रीकांत जाधव, चेअरमन शिवाजी देशमुख, माधव देशमुख, रामदास कांबळे, रामदास वाघमारे, प्रा.सचिन कबनूरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश कबनूरकर यांनी तर अशोक गुरुजी यांनी आभार मानले.
मोफत आरोग्य तपासणी
बिलोली - आधार बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने बिलोली आगारात मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी डॉ.जे.पी.द्विवेदी, डॉ.कल्पेेश, डॉ.वैशाली, डॉ.सुलक्षण, डॉ.सुरज, डॉ.विनोद यांनी आगारातील चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी आदींची तपासणी केली. यावेळी आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड, वाहतूक निरीक्षक बोधनकर, राजेश कदम, कैलास पांचाळ, प्रकाश भोसले आदी उपस्थित होते.
शहराध्यक्षपदी खंकरे
मुक्रमाबाद - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मुक्रमाबाद शहराध्यक्षपदी नंदकुमार खंकरे यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
अंध विद्यार्थिनींचा गौरव
हदगाव - जागतिक महिला दिनानिमित्त बरडशेवाळा येथे अंध विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचारी पांचाळ, अंगणवाडी सेविका शीला आहेर, संपदा चावरे, छायाबाई धुळधुळे, पूष्पा शेळके, संगीता ढेरे आदी उपस्थित होते.
शिंदे यांच्याकडून पाहणी
कंधार - तालुक्यातील तळ्याचीवाडी, ठाकूरतांडा, रामातांडा, पानशेवडी या गावात रविवारी आग लागून मोठे नुकसान झाले. सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी नायब तहसीलदार विजय चव्हाण, पानशेवडीचे सरपंच कोंडीबा मोरे, संगमवाडीचे प्रभाकर केंद्रे, व्यंकट गरजे उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
नायगाव - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुजलेगाव येथे विविध महिलांनी प्रभातफेरी काढली. हनुमान मंदिर सभागृहात ज्ञानज्याेती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती देशमुख तर पद्मीनबाई तुमवाड, लक्ष्मीबाई बोरबाड, ज्योती सुरेकाड, दिप्ती आईलवार आदींची यावेळी उपस्थिती होती.
गाळ काढणीस प्रारंभ
धर्माबाद - तालुक्यातील अतकूर येथे मालगुजारी तलाव असून या तलावात गाळ साचला आहे. माजी जि.प. सदस्य गंगाधर तोटलोड, पं.स. सभापती मारोती कांगेरु यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ झाला. यावेळी शंकर दारमोड, अतकूरचे तलाठी आदी उपस्थित होते.