नवापूर तालुक्यात अवैध मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:58 AM2020-07-07T11:58:20+5:302020-07-07T11:58:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : औरंगाबाद येथून कडोदरा सुरतकडे विना परवाना विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह पावणेपाच लाख रुपयांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : औरंगाबाद येथून कडोदरा सुरतकडे विना परवाना विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल एलसीबीच्याकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला़ पथकाकडून संशयित वाहन चालकासही अटक करण्यात आली आहे़
औरंगाबाद ते कडोदरा असा प्रवास करणाºया जी़जे ५ सी़एल ५५२६ हे वाहन राष्ट्रीय महामार्गावरुन नवापुर येथून करंजी मार्गे झामणझर रस्त्याकडे वळाली. सोनगढकडे जाणारा हा रस्ता आहे. दरम्यान अवैध एलसीबीचे कर्मचारी महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे व शांतीलाल पाटील यांना गुप्त बातमीद्वारे या मार्गाने अवैध मद्य तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती़ यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी खाजगी वाहनाने त्या कारचा पाठलाग केला. झामणझर गावाजवळ वाहनास अडवून विचारपुस केली असता चालकाने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. वाहनाची तपासणी केली असता त्यात दोन पोत्यांमध्ये ७३ हजार ७२० रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या़ ७३ हजाराच्या मद्यासह पथकाने चार लाख रुपयांचे वाहनही जप्त केले आहे़
याप्रकरणी चालक मोहसिन ऊर्फ मुन्ना अब्दुल कादर मावद रा. सुरत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे व शांतिलाल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.