14,840 विद्यार्थी यंदा उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 11:58 AM2019-06-09T11:58:57+5:302019-06-09T11:59:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावीच्या निकाल यंदा 74.44 टक्के लागला आहे. एकुण 19,935 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती. पैकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावीच्या निकाल यंदा 74.44 टक्के लागला आहे. एकुण 19,935 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती. पैकी 14,840 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींची टक्केवारी 80 टक्केपेक्षा अधीक आहे. 80.8 टक्के मुली तर 69.58 टक्के मुल उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्याचा दहावीचा निकालात यंदा टक्केवारी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागात सर्वात कमी अर्थात केवळ 74.44 टक्के निकाल लागला आहे. यंदा 10,700 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी 7,445 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 9,235 विद्यार्थीनी प्रविष्ठ होत्या पैकी 7,395 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्र्याची संख्या 2,770 इतकी आहे. प्रथम श्रेणीत 7,771, द्वितीय श्रेणीत 4,134 तर पास श्रेणीत 165 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला. पहिल्या 15 ते 20 मिनिटात निकालाच्या सर्वच साईट अगदी हळू चालत होत्या. एकाच वेळी हजारो विद्यार्थी साईटवर असल्यामुळे ही समस्या निर्माण होत होती. सव्वा वाजेनंतर मात्र सर्वच साईट फ्रि झाल्या. अनेक विद्याथ्र्यानी मोबाईलद्वारेच निकाल जाणून घेतला. त्यामुळे सायबर कॅफेवर निकाल पहाण्यासाठी गर्दी झाली नाही. निकालानंतर मिठाईच्या दुकानावर मिठाई घेण्यासाठी देखील गर्दी झाली होती. शाळांनी आपल्या गुणवंत विद्याथ्र्याना शाळांमध्ये बोलावून पालकांसह गुणवंत विद्याथ्र्याचा सन्मान केला.