नंदुरबार : अंगणात पडलेला चारा गायीने खाल्याने त्याचा राग येवून एकाने गायीस बेदम मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी अक्कलकुवा प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपीस 20 हजाराचा दंड व न्यायालय उठे र्पयत शिक्षा सुनावली.मगन दित्या वसावे रा.महूखाडी, ता.अक्कलकुवा असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची हकीकत अशी की, 24 मे 2016 रोजी महूखाडी येथील चंद्रसिंग मोतीराम वसावे यांची गाय जंगलात चरूण आल्यानंतर गावात आल्यावर मगन दित्या वसावे यांच्या अंगणासमोर आली. तेथे पडलेला चारा गायीने खाल्लाने त्याचा राग मगन वसावे यांना आला. त्यांनी लाकडी दांडक्याने गायीला बेदम मारहाण केली. त्यात गायीचा मृत्यू झाला. याबाबत चंद्रसिंग वावे यांच्या मुलाने अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दाखल करुन मगन वसावे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होवून दोषारोप पत्र अक्कलकुवा प्रथमवर्ग न्यायालयात सादर करण्यात आले. या खटल्यावर कामकाज होवून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी करभाजन यांनी मगन वसावे यांना दोषी ठरवून 20 हजार रुपयांचा दंड व न्यायालयाचे कामकाज संपेर्पयत बसून राहण्याची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड.एम.आय. मन्सुरी व अॅड.अजय सुरोळकर यांनी कामकाज पाहिले.
अक्कलकुवा येथे गायीस ठार मारणा-यास 20 हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:47 PM