आरोग्यसेवेला लागणार ‘200 खाटांचा आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:51 PM2018-11-26T12:51:45+5:302018-11-26T12:51:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2017 अखेरीस जिल्ह्यात तब्बल सहा लाख रुग्णांनी शासनाच्या वैद्यकीय सेवेचा घेतला़ आंतर आणि बाह्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 2017 अखेरीस जिल्ह्यात तब्बल सहा लाख रुग्णांनी शासनाच्या वैद्यकीय सेवेचा घेतला़ आंतर आणि बाह्य रुग्ण कक्षांमध्ये तपासणी आणि उपचार घेणा:या या रुग्णांची आरोग्य सेवेबाबत जागरुकता असली तरी खाटांअभावी या रुग्णांना सेवा देण्यात आरोग्य विभागाला अडथळे आले होत़े यामुळे आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात सुरु असलेले रुग्णालय, दवाखाने, प्रसूतीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे 200 खाटांची भर पडल्यास रूग्णसेवा सुलभ होणार आह़े
जिल्ह्यातील नागरिकांना 13 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 1 सामान्य रुग्णालय, 25 दवाखाने, 14 प्रसूतीगृहे, 58 प्राथमिक आरोग्य आणि 290 उपकेंद्र अशा 403 ठिकाणाहून वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत़ यासाठी 1 हजार 380 खाटांना आरोग्य विभागाने मंजूरी दिली आह़े यातून आंतररुग्ण म्हणून दाखल होणा:या रुग्णांना दीर्घकालीन सेवा मिळून त्यांचे आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत आह़े परंतू दर वर्षी रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने 1 हजार 300 खाटा अपु:या पडत असल्याने शासनाने जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, 100 खाटांचे महिला रुग्णालय आणि आयुष रुग्णालय निर्मितीची घोषणा केली होती़ परंतू सरत्या वर्षात या घोषणांच्या पुढे कामकाज झालेले नसल्याने तूर्तास 200 खाटांची तरतूद व्हावी असा पाठपुरावा आरोग्य विभागाने शासनाकडे सुरु केला आह़े या पाठपुराव्याला प्रमुख कारण म्हणजे जिल्ह्यात आंतररुग्णांची वाढती संख्या असल्याचे सांगण्यात येत आह़े
वैद्यकीय सुविधांची गरज लक्षात घेता शासनाने 500 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर ब:यापैकी समस्या सुटण्याची अपेक्षा होती़ परंतू त्याचे काम अद्यापही सुरु झालेले नसल्याने रुग्णसेवेचा प्रश्न अधांतरी आह़ेएकीकडे वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिक्षा असताना दुसरीकडे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील 100 खाटांचे महिला रुग्णालय, जमाना येथील 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय, धडगाव येथील 60 खाटांचे महिला रुग्णाजय यांची कामे अपूर्ण असल्याने रुग्णसेवेवरचा ताण कमी होत नसल्याची माहिती देण्यात आली आह़े ही कामे पूर्ण झाल्यावरही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरु होण्यास 2020 उजाडणार असल्याची माहिती आह़े
वैद्यकीय सुविधांमध्ये आयुष रुग्णालयाचा एक चांगला उपक्रम जिल्ह्यात यंदा सुरु होणार होता़ यासाठी जिल्हा रुग्णालयात जागा मंजूर करुनही केवळ इमारतीअभावी 30 खाटांचे हे रुग्णालय रखडले आह़े
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार 16 लाख लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून 2016-17 या वर्षात 1 लाख 84 हजार 381 रुग्णांनी त्या-त्या रुग्णालय, दवाखाने, प्रसूतीगृहे आणि आरोग्य केंद्राच्या आंतररुग्ण कक्षातून उपचार घेतले होत़े यात 38 हजार 588 पुरुष, 91 हजार 832 स्त्रिया आणि 53 हजार 970 मुलांचा समावेश आह़े दाखल झालेल्या या आंतररुग्णांनी किमान दोनपेक्षा अधिक दिवस उपचार घेतल्याने इतर रुग्णांना खाटा अपु:या पडल्या होत्या़ याच दरम्यान तब्बल 4 लाख 37 हजार 673 नागरिकांनी बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेतल्याची माहिती आह़ेयात 1 लाख 64 हजार 173 पुरुष, 2 लाख 27 हजार 410 स्त्रिया आणि 46 हजार 90 बालकांचा समावेश आह़े यातील काहींनी पुढे आंतररुग्ण कक्षांत दाखल होऊन उपचार घेतले होत़े
रुग्ण म्हणून दाखल होणा:या महिलांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यासाठी 749 खाटांची निर्मिती करण्यात आली आह़े तर लहान मुलांसाठी 191 खाटा जिल्ह्यात आहेत़ उर्वरित खाटा ह्या पुरुषांसाठी देण्यात येतात़ जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व 403 रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये केवळ 208 डॉक्टर सेवा देत आहेत़ त्यांच्या साथीला 480 परिचारिका आहेत़ यातही प्रसूतीगृहांसाठी स्त्रीरोग तज्ञांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आह़े जिल्ह्यात शासनाकडून केवळ 14 प्रसूतीगृहे चालवली जातात़ यात 3 अक्कलकुवा, 1 धडगाव, तळोदा 1, शहादा 2, नंदुरबार 4, तर नवापूर तालुक्यात 3 ठिकाणी प्रसूतीगृहे आह़े त्यातुलनेत 33 ठिकाणी खाजगी डॉक्टरांकडून खाजगी प्रसूतीगृहे जिल्ह्यात चालवली जातात़