लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशमूर्त्ीवर अखेरचा हात फिरविण्यात येत असून गुजरात व मध्यप्रदेशातील अनेक मोठय़ा मंडळांनी गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वेळेवर मूर्ती तयार करून त्या मंडळांना सुपूर्द करण्यासाठी शहरातील सर्वच लहान मोठय़ा 22 मूर्ती कारखान्यांमध्ये शेकडो हात राबत आहेत. नंदुरबारातील गणेशमूर्ती उद्योगाला यंदा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जीएसटीचा फटका आहेच शिवाय नोटबंदी आणि विविध कच्चा मालाचे वाढलेले भाव यामुळे मूर्तीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात वाढ करावी लागली आहे. येथील मूर्ती कारखान्यात गेल्या तीन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली होती. सद्यस्थितीत अनेक मूर्ती तयार झालेल्या आहेत तर काही मूर्त्ीवर अंतिम हात फिरविला जात आहे.पाच इंच ते 15 फूटयेथील मूर्ती कारागिरांनी अवघ्या पाच इंच ते 15 फूट उंचीच्या गणेशमूर्ती तयार केलेल्या आहेत त्या सर्वच विक्रीसाठी सज्ज आहेत. जवळपास पाच हजार मोठय़ा मूर्ती तर 25 हजारापेक्षा अधीक लहान मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत. घरगुती मूर्ती व्यावसायिकांनी लहान मूर्ती तयार केल्या आहेत. मोठय़ा मूर्ती या मूर्ती कारखान्यांमध्ये तयार केल्या जातात. मोठय़ा मूर्ती तयार करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा साचा आणि कच्चा माल तयार करावा लागतो. त्यानंतर मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी कारागिराला मेहनत घ्यावी लागते.दोन महिन्यांपूर्वी ऑर्डरनंदुरबारातील मूर्ती कारागिर हे राज्यभरातील इतर मूर्ती कारागिरांशी संपर्क साधून त्यांच्याकडील प्रसिद्ध असलेल्या मूर्त्ीची माहिती घेतात. त्यानुसार साचा तयार करून त्या मूर्ती बनविण्यात येतात. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणेशमूर्तीपासून ते लालबागचा राजा, कसबापेठ, कोल्हापूरचा राजा आदींसह तब्बल दीडशे प्रकार आहेत. मे महिन्यापासूनच विविध शहरातील मंडळ कार्यकते, व्यावसायिक व विक्रेते कुठल्या प्रकारच्या गणेशमूर्ती पाहिजे त्याची यादी व ऑर्डर देवून ठेवतात. त्यानुसार मूर्ती तयार करून त्या गणेशोत्सवाच्या किमान 15 दिवस अगोदर गणेशमूर्ती व्यावसायिक व विक्रेत्यांर्पयत पोहचविल्या जातात. यंदा देखील गेल्या आठवडय़ापासून मूर्ती पाठविण्यास सुरुवात झाली आहे. दररोज लहान, मोठय़ा मूर्ती भरून किमान तीन ते चार ट्रका बाहेरगावी जात आहेत. याशिवाय जिल्हाबाहेरील मंडळांनी बुकींग केलेल्या मूर्ती देखील रवाना केल्या जात आहेत.परराज्यातील मूर्ती विक्रेते देखील शहरात दाखल होऊ लागले आहेत. शहरातील स्टेट बँक रस्त्यावर विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्याकडील मूर्त्ीना देखील ब:यापैकी मागणी असते.
नंदुरबारात 25 हजार गणेशमूतींना मिळाला आकार
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: August 19, 2017 12:24 PM