नंदुरबारातील हाणामारीप्रकरणी 29 जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:24 AM2018-07-11T11:24:38+5:302018-07-11T11:25:15+5:30
नंदुरबार : कुरेशी मोहल्ला भागात रविवारी रात्री झालेल्या हाणामारीनंतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़ याप्रकरणी सोमवारी रात्री दुस:या गटाकडूनही फिर्याुद देण्यात आली असून त्यानुसार 29 जणांविरोधात गुन्हा दाखल आह़े
शेख रोशन शेख मेहबूब कुरेशी रा़ चिंचपाडा भिलाटी कुरेशी मोहल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोविंद यशवंत सामुद्रे, गुल्या सरू भिल, लक्ष्मण शाम ठाकरे, हसन बाबू कुरेशी, दंगल रतिलाल ठाकरे, चंद्या शाम ठाकरे, आकाश शाम ठाकरे, दिपा शाम ठाकरे, मश्या रमश्या ठाकरे, कन्हैय्या राजू मांग, अशोक जेमा पाडवी, मुका शाम ठाकरे, पोगा शाम ठाकरे, राकेश राजेश ठाकरे, दिनेश दिलीप ठाकरे, लखन शाम ठाकरे, अंबालाल जयसिंग ठाकरे, गुंडय़ा सरफू भिल, सुभाष सुदाम ठाकरे, किशोर बाबू ठाकरे, जगन रतीलाल ठाकरे, राजन संजू भिल, गोपी यशवंत सामुद्रे, सचिन शाम ठाकरे, मंगल रतीलाल ठाकरे, खुशाल शांताराम वसावे, कोल्या मोती ठोरक, वंकर रतिलाल ठाकरे यांच्याविरोधात जमावबंदी आदेशांचे उल्लंघन तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
सर्व संशयित आरोपींनी कुरेशी मोहल्ला, त्रिकोणी बिल्डींग परिसरात लाठय़ा, काठय़ा, तलवारी व रॉकेलचे डबे घेत घरांची तोडफोड करून चारचाकी वाहने पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आह़े दरम्यान दुस:या गटाकडून फिर्याद दाखल झाल्यानंतर चिंचपाडा भिलाटी परिसरातील महिलांनी मंगळवारी सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता़ रविवारी घरात घुसून मारहाण करतेवेळी त्यांच्याकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करत कुरेशी मोहल्ल्यातील संशयितांविरोधात दाखल गुन्ह्यात अॅट्रॉसिटी अॅक्टचाही समावेश करून सर्वाना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांची होती़ पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी महिलांची समजूत काढून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगूनही त्यांचे समाधान न झाल्याने उशिरार्पयत महिलांचा एक गट याठिकाणी थांबून होता़ याप्रकरणी पोलीसांकडून संशयितांचा शोध घेण्यात येत आह़े