लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात एक जुलै ते 31 ऑगस्ट यादरम्यान मतदार जागृती अभियान राबवण्यात आले होत़े यातून 35 हजार 261 मतदारांच्या नव्याने नोंदण्यात करण्यात आल्या आहेत़ दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीत झालेल्या या अभियानातून 10 हजार मतदार वगळण्यात आले आहेत़ निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात मतदार नोंदणी आणि दुरूस्ती अभियान सातत्याने राबवण्यात येत आह़े यातून गेल्या दोन महिन्यात 50 हजार मतदारांच्या नोंदण्या, दुरूस्त्या आणि स्थलांतर याची प्रक्रिया निवडणूक शाखेने पूर्ण केली आह़े या मोहिम काळात जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले एक हजार बीएलओंच्या माध्यातून विविध महाविद्यालय, रहिवासी वसाहती, ग्रामसभा, पंचायत समितींतर्गत गावांमध्ये जाऊन नोंदण्या केल्या आहेत़ राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही आकडेवारी समाधानकारक असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आह़े मोहिमेत 18 ते 21 वयोगटातील युवकांची नोंदणी 70 टक्के झाल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत या नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आह़े
35 हजार मतदारांची नव्याने नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:27 AM
35 हजार मतदारांची नव्याने नोंदणी
ठळक मुद्दे1 हजाराच्यावर बिएलओ कार्यरत मतदार नोंदणी मोहिमेत मतदार यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची संख्या 35 हजार 261 आह़े नावात दुरूस्ती करून नव्याने समाविष्ट तीन हजार 907 तर जिल्हांतर्गत स्थलांतर झालेल्या आठ हजार 718 मतदारांची नोंदणी करण्यात आली आपुरूषांपेक्षा महिला मतदार अधिक दोन महिन्याच्या कालावधीत अक्कलकुवा तालुक्यात तीन हजार 651 मतदारांची नोंदणी झाली यात 1 हजार 901 पुरूष आणि एक हजार 750 स्त्रीय आहेत़ धडगाव तालुक्यात तीन हजार 102 जणांच्या नोंदण्या झाल्या़ यात 1 हजार 596 पुरूष आणि 1 हजार 506 स