लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐन पितृपक्षात ग्रामपंचायत निवडणूकांचे नामनिर्देशन भरण्याची वेळ आल्याने इच्छुकांनी हात आखडता घेतला आह़े गत चार दिवसात निवडणूक प्रक्रियेबाबतची उदासिनता सोमवारीही कायम होती़ दिवसभरात केवळ एक अर्ज दाखल करण्यात आला आह़े शुक्रवारपासून ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तहसील कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या निवडणूक कक्ष गजबजण्याची शक्यता वर्तवली जात होती़ मात्र याउलट स्थिती गेल्या तीन दिवसात होती़ हीच स्थिती सोमवारी चौथ्या दिवशी कायम होती़ शहादा, नवापूर, नंदुरबार आणि अक्कलकुवा तहसील कार्यालयात केवळ कागदपत्रे तयार करणा:यांची गर्दी दिसून आली़ नामनिर्देशन दाखल करून त्याची प्रिंट निवडणूक कक्षात जमा करणारे अद्यापही कक्षांकडे फिरकत नसल्याची माहिती अधिकारी व कर्मचारी यांनी दिली आह़े पितृपक्षामुळे निवडणूकीसारखा महत्त्वाचा निर्णय इच्छुकांनी दोन दिवस लांबणीवर टाकल्याची माहिती आह़े तर काही ठिकाणी निवडणूक आयोगाची पंचायत इलेक्शन ही वेबसाईट संथ इंटरनेट स्पीडमुळे वारंवार हँग होत असल्याचे सांगण्यात आले आह़े यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाच्या ग्रामपंचायत कक्षात संपर्क केला असता, अपवादात्मक एक-दोन ठिकाणी हे घडल्याचे सांगण्यात आल़े याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातून माहिती घेतली असता, बाहेर नामनिर्देशन दाखल करणा:या उमेदवारांना ही समस्या आल्याची माहिती मिळाली आह़े संग्राम केंद्र, आपले सरकार, ई-सेवा केंद्रासह खाजगी सायबर कॅफे व किंवा वैयक्तिक स्तरावर उमेदवार ऑनलाईन अर्ज भरणा करण्याची सोय आह़े निवडणूक आयोगाने यासाठी संबधित केंद्रांना महत्त्वपूर्ण माहिती याआधीच पाठवली आह़े
जिल्ह्यातील 51 गावांमध्ये धामधूम ऐवजी सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:52 PM
ग्रामपंचायत निवडणूक : चार दिवसात केवळ एक नामनिर्देशन दाखल
ठळक मुद्दे नामनिर्देशन भरून तयार पण सबमिट रोखले निवडणूक आयोगाच्या पंचायत इलेक्शन या वेबसाईटवर नंदुरबार जिल्ह्यातील 100 च्यावर इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरून दिल्याची माहिती सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक कक्षाकडून देण्यात आली़ मात