भूषण रामराजे।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुरूषांची मक्तेदारी मानल्या जाणा:या राजकीय क्षेत्रात महिलांना समान आरक्षण देण्यात आले आह़े यामुळे पुरूषांची मक्तेदारी केवळ आकडेवारीत कमी झाली आह़े जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या 51 ग्रामपंचायतींत 65 टक्के महिला निवडून येणार असल्याने महिलाराजची सुसंधी ग्रामपंचायतींना लाभणार आह़े नवापूर तालुक्यात 12, नंदुरबार 16, अक्कलकुवा 15, शहादा आठ आणि तळोदा तालुक्यातील एक अशा 52 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिला दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही़ 52 गावांच्या 228 प्रभागात लढवल्या जाणा:या या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवारांना उभे राहता येणार आह़े प्रभागरचनेनुसार एकूण 611 सदस्यपदासाठी होत असलेल्या प्रक्रियेत 337 महिला निवडून येणार आहेत़ यात अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण संवर्गातून महिला प्रतिनिधित्व करणार आहेत़ यातही 24 ठिकाणी महिला सरपंचाचे आरक्षण आह़े यामुळे 361 महिला प्रतिनिधी प्रथमच ग्रामपंचायतींसाठी एकत्रित ताकद आजमावणार आह़े महिलांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे पुरूषांच्या जागा आपसूकच कमी होऊन अनेक विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांना पाच वर्षानंतर संधी मिळण्याची शक्यता आह़े मात्र पुन्हा आरक्षण घोषित झाल्यास पाच वर्षे सदस्य पदावर समाधान मानावे लागेल़
52 ग्रामपंचायतींत 65 टक्के महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 1:29 PM