लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनावर उपचार करण्यासाठी शासकीय आणि खाजगी रुग्णालयात एकूण ९९४ बेड्स निर्माण करण्यात आले आहेत़ या बेड्सवर सध्या केवळ ३१९ रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे़ उर्वरित रुग्ण जिल्ह्याबाहेर तर बहुतांश रुग्ण हे होमआयसोलेट राहून उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे़‘लोकमत’ने जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल्समधील बेडची स्थिती रविवारी पडताळून पाहिली होती़ यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या सर्वाधिक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती असून १० खाजगी कोविड कक्षांमध्ये बहुसंख्य बेड हे रिकामे असल्याचे दिसून आले आहे़ जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून ४ हजार ९६९ वर पोहोचली आहे़ यात ४ हजार २९५ रूग्ण हे बरे होवून घरी गेले आहेत़ तर ११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ एकूण ८६४ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे़ यातील ४२ रुग्ण हे जिल्ह्याबाहेर तर ३१९ रुग्ण हे १४ कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत़ जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने बेड रिकामे असल्याचा दावा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला आहे़ दुसरीकडे होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या चार्टमधून समोर आले आहे़जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या ९९४ पैकी ७०० बेड हे व्हेंटीलेटर आणि आॅक्सिजन सिलींडरसह असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यामुळे जिल्ह्यात कोरोना बेड्सबाबत कोणतीही ओरड नसल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे़नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात डिस्ट्रीक्ट कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण १४० बेडची क्षमता आहे़ यापैकी ५२ बेडवर सध्या रुग्ण असून ८८ बेड रिकामे आहेत़ सोबत शहरातील एकलव्य कोविड केअर सेंटरमध्ये २७० रुग्ण क्षमता आहे़ याठिकाणी सध्या केवळ ३९ रुग्ण उपचार घेत असून २३१ बेड रिकामे आहेत़ शहादा येथील कोविड केअर सेंटरमध्ये १२० पैकी ८८ बेड रिकामे असून ३२ बेडवर पेशंट आहेत़ नवापूर येथील कोरोना कक्षात ५० बेड असून याठिकाणी ३ रुग्ण उपचार घेत आहेत़ ४७ बेड खाली आहेत़ तळोदा तालुक्यातील सलसाडी येथे ५० बेड क्षमता असून याठिकाणी २९ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत़ तर २१ बेड हे रिकामे असल्याची माहिती देण्यात आली आहे़ प्रशासन येत्या काही दिवसात १०० बेड वाढणार आहेत़४९९४ बेड्स पैकी ५३० बेड्स हे शासकीय रुग्णालयातील आहेत़ उर्वरित ११ खाजगी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्याही नगण्य आहे़ जिल्ह्याबाहेर सध्या ४२ रूग्ण उपचार घेत असून ५०३ जण होम आयसोलेशन उपक्रमांतर्गत घरीच वैद्यकीय पथकांच्या देखरेखीत उपचार घेत असल्याची माहिती आहे़४जिल्ह्यात नऊ खाजगी कोविड हॉस्पिटल्स आहेत़ यात चार नंदुरबार शहरात, तीन नवापूर तर दोन शहादा येथे आहेत़ याठिकाणी एकूण ३६४ बेड आहेत़ यापैकी २०० बेड रिकामे आहेत़४पाचही शासकीय रुग्णालयांमध्ये ४७५ बेडवर रुग्ण नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे़ यामुळे येत्या काळात रुग्ण संख्या वाढल्यास अडचणी येणार नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे़
कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच उपचार घेण्यावर भर देत आहेत़ त्यांच्याकडून होम आयोसोलेशनचे नियम पाळले जातात़ जिल्हा आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून असते़ सद्यस्थितीत संपूर्ण रुग्णांची स्थिती तपासून त्यांच्या संमतीने दाखल केले जात आहे़-डॉ़ के़.डी़. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबाऱ