लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : मागील तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान १२८ अपघात झाले आहेत़ यात, तब्बल ९२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ तर १७५ जण जखमी झाल्याची माहिती आहे़नेत्रंग-शेवाडी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान सुरू असणारे अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे आहे़ दरम्यान देवमोगरा यात्रेसाठी जाणाऱ्या व दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची वाहतूक सुरक्षादेखील वाºयावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही फाट्याजवळ दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे दोघे शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती़ लगेच दुसºया दिवशी शनिवारी तळोदा तालुक्यातील बुधावली येथे दुचाकीच्या अपघातात एज जण जागीच ठार झाला होता़ त्यानंतर दोन मोटार सायकली एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, देवमोगरा येथे मातेचे दर्शनासाठी जाणाºया भंगारबर्डी ता.शिरपूर येथील चैत्राम पावरा व शेगा पावरा यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता़ याशिवाय दुचाकी व पादचारी यात्रेकरूंना दररोज बेशिस्त, भरधाव व अनियंत्रित वाहनांमुळे लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारांमुळे देवमोगरा यात्रेकरूंच्या वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ यात्रेकरूंची वाहतूक सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यानचा रस्ता हा महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा असून दिवसभर शेकडो वाहनांची वर्दळ या दरम्यान असते. अनियंत्रित व भरधाव धावणारी वाहने, बेशिस्त व अप्रशिक्षित चालक यामुळे या महामार्गावर दररोजचे अपघात होताना दिसून येत आहेत. सध्या गुजरात राज्यातील आदिवासी बांधवांची कुलदेवता असलेल्या देवमोगरा मातेचा यात्रोत्सव सुरू आहे़ यानिमित्त दररोज शेकडो भाविक या मार्गावरुन ये-जा करत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर धावणाºया शेकडो अवजड वाहनांमुळे यात्रेकरूंच्या वाहतूक सुरक्षिततेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरवर्षी देवमोगरा यात्रेसाठी येणाºया भाविकांना अपघाताला सामोरे जावे लागते. अनेकांना तर जीव गमवावा लागत असतो़ यावर्षीदेखील या अपघातांच्या मालिकांची पुनरावृत्ती होत असून यंदा दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक अपघातांची पोलीसात नोंद आहे तर अनेक जण धार्मिक कार्यात पोलिस व इतर गोष्टींचा ससेमिरा नको म्हणून अपघातांची नोंद करणे टाळतात. यात्रा कालावधीत प्रशासनाकडून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असताना कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे. तसेच संपूर्ण वर्षभर राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान अपघातांची मालिका सुरूच असते. यात , मोठ्या संख्येने अवजड वाहनांमुळे अपघात होत असतात़अंकलेश्वर-बºहाणपुर आंतरराज्य महामार्गावरील तळोदा ते गुजरात पर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर आतापर्यंत रुंदीकरणाचे काम करण्यात आलेले नाही़ केवळ राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन फलक लावण्यात आलेले आहेत़ या मार्गावर क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने वाहने दररोज धावत असून इतर प्रवाशांना प्रवास करणे जिकरीचे झालेले आहे़ त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून सुरक्षा उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे़
तीन वर्षात ९२ जणांनी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:51 AM