नंदुरबार: कोळदा येथे बॅनर लावण्यास विरोध करीत आणि लावलेले बॅनर फाडून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, कोळदा येथे चौकात बॅनर लावण्यास काही जणांनी विरोध केला. तरीही रात्रीतून बॅनर लावल्याने ते बॅनर काही जणांनी फाडले. शिवाय जमाव जमा करून जातिवाचक शिवीगाळ केली. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला. याबाबत मिलिंद नंदलाल गवळे यांनी फिर्याद दिल्याने पंकज जलू राजपूत (३४), हेमंत राजेंद्र राजपूत (३१), राजेंद्र राजपूत (२८), गणेश युवराज राजपूत (३२), अनिल बाबू कुऱ्हाडे (२९), दिनेश वडार (३१), राकेश विजयसिंग राजपूत (३२), रोनक नामदेव राजपूत (१९), गणेश उर्फ रवींद्र रजसिंग राजपूत (२३), दीपक उर्फ अशोक राजपूत (२३), प्रदीप राजपूत (३२, सर्व रा. कोळदा, ता. नंदुरबार) यांच्याविरुद्ध गैर कायद्याचा जमाव जमावणे, जातिवाचक शिवीगाळ करणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.