विचारांचा विकास झाला तर हमखास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:02 AM2017-09-11T11:02:09+5:302017-09-11T11:02:30+5:30

टीटीएसएफतर्फे महामेळावा : सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांचे प्रतिपादन

 In -able In Whatever In In Common In Common Indian In This Wellschick Common | विचारांचा विकास झाला तर हमखास यश

विचारांचा विकास झाला तर हमखास यश

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासनाकडून पंप मिळाला, गिरणी, पाईप मिळाले किंवा शिकून नोकरी केली, घर बांधलं म्हणजे विकास झाला, असं नाही, सर्वात आधी विचारांचा विकास झाला की मग कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळवता येतं, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी केल़े ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनतर्फे नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा महामेळाव्यात ते बोलत होत़े 
अध्यक्षस्थानी ग्रँट मेडिकल कॉलेजचे सेवानिवृत्त प्रशासनाधिकारी डी़एस़वसावे तर प्रमुख अतिथी म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद्र महाजन, आयआरएस अजय खर्डे उपस्थित होत़े प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते याहामोगी देवीच्या प्रतिमेचे पूजन झाल़े भिल्ल समाजात पहिले जिल्हाधिकारी असा मान मिळवणा:या डॉ़ राजेंद्र भारूड यांनी उपस्थित 10 हजार विद्याथ्र्यासोबत दिलखुलास संवाद साधला़ प्रसंगी डॉ़ भारूड म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात काम करत असताना, किनवट येथील बोगस आदिवासींचे प्रकरण बाहेर काढले, यात मोर्चे आणि उपोषणांना सामोरे गेलो, अशा वेळी मनात एकच विचार होता़ मूळ आदिवासींना न्याय मिळवून द्यायचा, त्यासाठी लढलो आणि यशस्वीही झालो़ आदिवासी हा जंगलाचा राजा असतो, हे कायम ध्यानी ठेवलं, कधी कोणापुढे हात पसरला नाही़ 
यश मिळवायचं असेल तर त्याने मी कशात कमी पडलो याचा शोघ घेतला पाहिज़े आत्मपरीक्षण करून काय कमी आहे, ते शोधून त्यात संकल्पाचं बीज पेरावं़ मला काय व्हायचं आहे हे ठरवलं पाहिजे, त्यातून बदल घडवून आणला पाहिज़े ब:याच वेळा असं आदिवासी गाव पाडय़ावरून आलो म्हणून मुलं स्वत:ला कमी लेखतात पण ज्याने निसर्गासोबत दोन हात केले, समस्या सोडवल्या त्याला शहरी समस्यांची भिती नसावी, स्पर्धा परीक्षा किंवा इतर तत्सम ठिकाणी यश मिळवण्यासाठी केलेल्या संकल्पाला उत्साहाची जोड दिल्यास तुम्हीच तुमचे शिल्पकार होणार असेही शेवटी डॉ़ भारूड म्हणाल़े कार्यक्रमास डॉ़ भरत वळवी, डॉ़ राजेश वळवी, इंजि़ जेलसिंग पावरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातील 10 हजार युवक, युवती, महिला व आदिवासी समाजबांधव  हजर होत़े मंचावर डॉ़ भारूड यांच्या मातोश्री यांचे ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले मातृतदिनाचे ‘विशेषवृत्त’ पोस्टर रूपात लावण्यात आले होत़े

Web Title:  In -able In Whatever In In Common In Common Indian In This Wellschick Common

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.