लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या वाडी अर्थात जीवननगर, ता.शहादा येथील विधवा विस्थापित महिलेस तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर मंगळवारी तिच्या हातात प्रत्यक्ष प्रशासनाने जमिनीचा सातबारा दिल्याने अक्षरश: ती भारावली होती. आता स्वत: जमीन कसणार असल्याचेही तिने सांगितले.हाती, ता.धडगाव येथील विधवा महिला कु सालीबाई दाज्या पटले हिचे घरदार व जमीन सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याच्या बुडीताखाली आल्यामुळे प्रशासनाने तिला बाधित म्हणून घोषित करून २००६ मध्ये शहादा तालुक्यातील वाडी अर्थात जीवनगर वसाहतीत पुनर्वसन केले आहे.या महिलेस घर प्लॉट देण्यात आला आहे. तथापि हक्काची जमीन प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली नव्हती. त्यामुळे ती मोल मजुरी करून संसाराचा गाडा चालवित आहे. त्यातच पतीच्या निधनामुळे कु टूंबा पालन पोषण एकटीलाच करावे लागत होते. अशा बिकट परिस्थितीतून कु सालीबाई हिने हक्काच्या जमिनीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत संघर्ष केला. यासाठी थेट सरदार सरोवर प्रकल्पाच्या स्थानिक अधिकऱ्यांपासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा प्रशासनाकडे थेटे घातले होते. एवढे करूनही तिच्या पदरी निराशाच येत होती. परंतु ती डगमगली नाही. पुढेही तिने प्रशासनाकडे पाठ पुरावा सुरूच ठेवला होता. अर्थात तिला प्रशासनाने २०१२ मध्ये जमीन दाखविली होती. परतु जमीन खराब, नापिकी शिवाज स्मशानभूमी होती. त्यामुळे तिने नाकारली. पुन्हा २०१६ मध्ये जावदे शिवारात जमीन दाखविण्यात आली. मात्र या जमिनीचे तीन तुकडे होते. त्यात नालादेखील गेलेला होता. तिही पसंत पडली नाही. मात्र तिने प्रशासनाकडे जमिनीचा रेटा लावूनच धरला. साहजिकच प्रशासनातील अधिकारी जमिनीच्या शोध घेत होते. शेवटी पाडाळदा शिवारातील खाजगी शेतकºयाची जमीन तिला पसंत पडली.२०१७ मध्ये ह जमीन प्रशासनाने खरेदी केली होती. मात्र सदर शेतकºयाला त्याची एकण रक्कमेपैक राहिलेली पाच टक्के रक्कम प्रशासनाने दिली नव्हती. परिणामी तोदेखील जमिनीचा ताबा सोडत नव्हता. त्यामुळे कु सालीबाईच्या नावावर शेत जमीन खरेदी झालेली असताना केवळ काही रक्कम अभावी तिला दोन-तीन वर्षापासून प्रत्यक्ष)त जमिनीचा ताबा मिळत नव्हता. शेवटी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर व इतर कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी वारंवार झगडून या विधवा महिलेला अखेर मंगळवारी जमिनीचा सातबारा मिळवून दिला.साहजिकच महिलेलाही तब्बल १४ वर्षाच्या संघर्षानंतर प्रत्यक्षात हातात सातबारा मिळाल्याने तब्बल १४ वर्षाच्या संघर्षानंतर प्रत्यक्षात हातात सातबारा मिळाल्याने तिच्या चेहºयावर हास्य उमटले होते.४तारूण्यातच पतीचे छत्र हरपले असताना आपल्या कु टूंबाचा गाडा हाकलून कुसलीबाईने मुलास हॉकीच्या उत्कृ ष्ट खेळाडू बनविले. मुलगा खुमानसिंग पटले याने पुण्यातील क्रि डा प्रबोधिनीत शिक्षण घेतल्यानंतर राज्याच्या हॉकी संघात स्थान मिळविले होते. तथापि घरची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकु वत असल्यामुळे त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने पोलीस खात्याची परीक्षा देऊन पोलिसांची नोकरी पत्करली. आता सद्या तो पुण्यात कार्यरत आहे. अर्थात त्याला शिक्षणासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत केली होती. तरीही एका उत्कृ ष्ट हॉकीच्या खेळाडूच्या मातेस तब्बल १४ वर्षे हक्काच्या जमिनीसाठी प्रशासनाशी संघर्ष करावा लागल्याचे शल्य या महिलेने बोलून दाखविले होते.
१४ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर कु सालीबाईला मिळाला सातबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:31 AM