शहाद्यात जिनिंग मिलच्या कार्यालयातून १५ लाखांची रक्कम लंपास
By मनोज शेलार | Published: June 21, 2023 06:25 PM2023-06-21T18:25:11+5:302023-06-21T18:25:20+5:30
शहादा येथे श्रीराम कॉटन फायबर जिनिंग मिल आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी विकलेला कापूस ठेवण्यात आला आहे.
नंदुरबार : शहादा येथील जिनिंग मिलच्या कार्यालयातून चोरट्यांनी १५ लाख ५३ हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना २० रोजी घडली. कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांना देण्यासाठी कार्यालयातील कपाटात रक्कम ठेवण्यात आली होती.
शहादा येथे श्रीराम कॉटन फायबर जिनिंग मिल आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी विकलेला कापूस ठेवण्यात आला आहे. कापूस विक्रीचे पैसे जिनिंग मालकाने कार्यालयातील ड्राव्हर व कपाटात ठेवले होते. शेतकऱ्यांना वायदाप्रमाणे ती रक्कम दिली जाणार होती. चोरट्यांनी शिताफीने कार्यालयात घुसून १५ लाख ५३ हजार रोख रुपये चोरून नेले.
कपाटात ठेवलेली रक्कम काढण्यासाठी सुनील रोहिदास पाटील हे गेले असता त्यांना रक्कम जागेवर नसल्याचे दिसून आले. शोधाशोध करूनही उपयोग झाला नसल्याने त्यांनी शहादा पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार छगन चव्हाण करीत आहेत.