अक्कलकुवा येथे अंनिसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:51+5:302021-09-15T04:35:51+5:30
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. डी. बी. शेंडे, जिल्हा प्रधान सचिव ...
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. डी. बी. शेंडे, जिल्हा प्रधान सचिव कीर्तीवर्धन तायडे, तळोदा शाखा कार्याध्यक्ष मुकेश कापुरे, सुमित्रा वसावे, विजय वळवी, रामदास साळवे, निर्मला वसावे, अॅड. मंगला वसावे, शेख आयेशा, यशवंत वळवी, शीतल वसावे, गणेश वसावे, राजेंद्र वसावे, शेख सलमा, अन्सारी आस्मा आदी उपस्थित होते.
बैठकीत विनायक साळवे यांनी महाराष्ट्र अंनिसच्या कामकाजाची माहिती दिली. अंनिसच्या कामाची पंचसूत्री सांगून अंनिसचे काम हे कोणत्याही देवा-धर्माच्या विरोधात नसून शोषण व अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. जिल्हा प्रधान सचिव तायडे यांनी अंनिसच्या संघटनात्मक कार्यपद्धती व रचना सांगितली. बैठकीत अक्कलकुवा तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. डाकीणचा प्रश्न गंभीर असून डाकीण प्रथेविरोधात प्रबोधनासाठी कामाची आवश्यकता असल्याचे अक्कलकुवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सांगितले. अक्कलकुवा तालुक्यातील अंनिसच्या कामाला गती देण्याची गरज बैठकीत चर्चेतून पुढे आली. आगामी काळात अक्कलकुवा येथे अंनिसचे काम संघटितपणे सुरु करण्यासाठी शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले.