जिल्हा रुग्णालयात सेवेसाठी ३० परिचारिकांच्या नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:41 PM2020-04-26T13:41:47+5:302020-04-26T13:43:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कामाचा ताण वाढत असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात नियुक्त असलेल्या ३० परिचारिकांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कामाचा ताण वाढत असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात नियुक्त असलेल्या ३० परिचारिकांची जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉॅर्डात नियुक्ती केली आहे़ २४ पासून या परिचारिका कामावर रुजू होणार आहेत़
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाने तब्बल १०० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे़ यावार्डात आरोग्य अधिकारी प्रत्येकी चार ते सहा तास तर परिचारिका ह्या आठ तासांची ड्यूटी करत आहेत़ परंतू कामाचा वाढता ताण आणि कामावर आलेल्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी रोटेशन पद्धतीेने कामकाज सुरु करण्यात आले आहे़ यांतर्गत सात दिवस परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा एक गट तर सात दिवस दुसरा गट या पद्धतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे़ यासाठी नव्याने ३० परिचारिक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़आऱडी़ भोये यांनी २२ रोजी काढले होते़ यानुसार २४ पासून परिचारिक कामावर येण्यास सुरुवात झाली आहे़
जिल्ह्यातील इतर सात ठिकाणच्या क्वारंटाईन कक्षांमध्येही परिचारिका मोलाची भूमिका बजावत असून त्यांच्याकडून रुग्णांना दररोज मार्गदर्शन करण्यात येत आहे़ दरम्यान विलगीकरण कक्षात राहणाºया रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी सायकेट्रीस नर्स, कम्युनिटी नर्स यांच्याही नियुक्त्या करण्यात येत आहेत़
जिल्ह्यातील सात विलगीकरण कक्ष आणि जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात बºयाच परिचारिका ह्या स्वखुशीने गेल्या १ महिन्यापासून काम करत आहेत़ त्यांच्याकडून नोकरीसोबत सेवाभाव हाच वसा असल्याचे सांगून १० ते ११ तास सेवा दिली जात आहे़ रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डसोबत गर्भवती मातांनाही दाखल केले असल्याने त्यांचीही वेळेवर देखभाल करण्यात येत आहे़
जिल्हा रुग्णालयात सध्या वैद्यकीय पथकातील २४ अधिकारी आयसोलेशन वॉर्डावर नजर ठेवून आहेत़ जिल्हा रुग्णालयात तब्बल ९२ परिचारिका नियुक्त करण्यात आल्या आहेत़ या परिचारिक आयसोलेशन वॉर्डासोबतच कक्षासोबतच गर्भवती मातांचा कक्ष, अपघात कक्ष, गंभीर शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांचीही देखभाल करत आहेत़ शिफ्ट ड्यूटीजमध्ये कामकाज होत असले तरीही बºयाचवेळा कामात उशिर होऊन थकवा जाणवत असतानाही निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सेवा देत असल्याचे दिसून येत आहे़ रुग्णालयात ५० खाटा असलेला नवीन कक्ष तयार सज्ज आहे़ यातून १०० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे़ दक्षता म्हणून नियुक्त असलेले सर्वच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी या कक्षांचा आढावा घेत तेथील स्थिती तपासून कक्ष सज्ज ठेवत आहेत़
याठिकाणी येणाºया सर्व ३० परिचारिकांची भोजन आणि निवासाची व्यवस्था ही प्रशासन करत आहे़ वेळेवर सर्व काही पुरवठा व्हावा याकडेही लक्ष दिले जात आहे़
एन्डरली केअर कार्यक्रम, पॉलिऐक्टिव्ह केअर कार्यक्रम, आयपीएचएस, एनसीडी या कार्यक्रमांतर्गत काम करणाºया परिचारिकांसोबत धडगाव, जमाना, विसरवाडी, खांडबारा रनाळे येथील ग्रामीण रुग्णालय तर तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका येथे नियुक्त करण्यात आल्या आहेत़
नियुक्त करण्यात येणाºया बहुतांश परिचारिकांचे वय आणि त्यांचे शारिरिक क्षमता तपासून त्यांना सेवेसाठी आमंत्रित करण्यात येत आहे़
काहींच्या अडीअडचणी तसेच कौटूंबिक समस्या लक्षात घेऊन त्यांना जवळच्या विलगीकरण कक्षात सेवा देण्याबाबत सूट देण्यात आली आहे़
जिल्ह्यातील तळोदा, नवापुर आणि शहादा येथील कक्षांमध्ये सेवा देणाºया अधिपरिचारिका ह्या सातत्याने दाखल असलेल्यांचे समुपदेशनही करत आहेत़ यातून विलगीकरण कक्षातही आनंदी वातावरण ठेवण्यात त्यांना यश आल्याची माहिती देण्यात येत आहे़