तळोदा, अक्कलकुव्यात नोडल अधिका:यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:28 AM2018-07-11T11:28:34+5:302018-07-11T11:28:38+5:30

Appointment of nodal officer in Taloda, Akkalakuta | तळोदा, अक्कलकुव्यात नोडल अधिका:यांची नियुक्ती

तळोदा, अक्कलकुव्यात नोडल अधिका:यांची नियुक्ती

Next

तळोदा/वाण्यावहिर : केंद्र शासनाच्या संपूर्ण ग्रामस्वराज्य अभियानाची प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून  हालचालींना वेग देण्यात आला आह़े तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या गटांमध्ये 12 ते 18 जुलै दरम्यान गावक:यांचे मेळावे घेण्यात येण्याचे नियोजन पंचायत समिती प्रशासनाकडून करण्यात आले आह़े यासाठी नोडल अधिका:यांचीही नियुक्ती करण्यात आली आह़े 
तळोद्यात पाच गटांमध्ये मेळावे
तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये 12 ते 18 जुलै दरम्यान पाच दिवस ग्रामस्थांचे मेळावे घेण्याचे नियोजन पंचायत समितीकडून करण्यात आले आह़े त्यासाठी नोडल अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली आह़े केंद्र शासनाची उज्ज्वला गॅस योजना, पीक विमा योजना, मुद्रा योजना, सौभाग्य वीज योजना, रोजगार हमी योजना, कृषी विमा योजना, घरकुल योजना अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्वराज्य अभियान थेट ग्रामीण भागात राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत़ 
या योजनेअंतर्गत संबंधित सर्व अधिका:यांना एका ठिकाणी आणत पात्र लाभाथ्र्याचे आवेदन भरुन त्यांना जागेवरच लाभ देण्याचे शासनाचे नियोजन आहेत़ या शिवाय या योजनांबाबत ग्रामीण भागात जनजागृती करण्याचेही उद्दीष्ट आह़े त्यानुसार येथील पंचायत समितीकडून या अभियानाचे जिल्हा परिषदेच्या पाचही गटात ग्रामस्थांचे मेळावे आयोजीत करण्याचे नियोजन करण्यात आले आह़े मेळाव्यासाठी नोडल अधिका:यांचीही नियुक्ती करण्यात आली आह़े त्यानुसार 12 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या धनपूर गटात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांच्या उपस्थितीत होईल़ या मेळाव्यात धनपूरसह, राणीपूर, न्यूबन, रांझणी, रेवानगर, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसन, रोझवा, काजीपूर यांचा समावेश राहिल़ 13 जुलै रोजी आमलाड येथे अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली ामलाड, दसवड, तळवे, नवागाव, चिनोदा, सलसाडी, त:हावद, मोरवड, कडेल,चौगाव, छोटा धनपूर, खरवड, खेडले, धानोरा ही गावे आहेत़ तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या उपस्थितीत 16 जुलै रोजी अमोनी गटात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आह़े 
यात, अमोणी, सरदार नगर, वाल्हेरी, अंमलपाडा, राणीपूर, इच्छागव्हाण, शिव्रे, पिपरपाडा ही गावे समाविष्ट करण्यात आली आह़े बोरद येथे 17 जुलै रोजी घेण्यात येणा:या मेळाव्यात बोरद, मालदा, मोड, मोहिदा, करडे, लाखापूर (फॉरेस्ट), लाखापूर ही गावे असती़ मेळाव्याला वनविभागाचे उपवनसंरक्षक अनील थोरात उपस्थित राहतील़ अभियानाच्या शेवटच्या दिवशी 18 जुलै रोजी बुधावल येथे मेळावा होईल़ 
यात, बुधावल, भवर, दलेलपूर, राजविहिर, लोभाणी, नर्मदानग, मोदलपाडा, सोमावल बुद्रूक, खुशगव्हाण,नळगव्हाण, सोमावल खुर्द व ङिारी आदींचा समावेश आह़े हा मेळावा समाज कल्याण अधिकारी प्रीतेश वळवी यांच्या उपस्थितीत होईल़ 
अक्कलकुवा तालुक्यातील 85 गावांची झाली निवड
अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांची निवड केली आह़े त्यात, अक्कलकुवा तालुक्यातील 85 गावांची निवड झाली आह़े  केंद्र शासनाच्या विविध  योजना सर्व गावामध्ये राबवून त्या ठिकाणी 100 टक्के साध्य करण्यासाठी नोडल अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली आह़े जिल्हा परिषद गट निहाय हा कार्यक्रम होणार आह़े अक्कलकुवा तालुक्यातील  भांग्रापाणी गट नोडल अधिकारी म्हणून अक्कलकुवा  तहसीलदार नितीनकुमार देवरे , 13 जुलै रोजी वेली गट नोडल अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी  प्रविण वानखेडे, 16 जुलै रोजी होणा:या मेळाव्यासाठी मोरंबा गट नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी  एम़ जी़ पोतदार, 17 जुलै होणा:या मेळाव्यासाठीगंगापुर गट नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, 18 जुलै रोजी मोलगी गट नोडल अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता ज़ेबी़पावरा, 19 जुलै रोजी पिंपळखूटा गट नोडल अधिकारी म्हणून राकेश महाजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नंदुरबार,   20 जुलै रोजी होराफळी गट नोडल अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विजयकुमार भांगरे, 21 जुलै रोजी रायसिंगपुर गट नोडल अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता डी़ डी़ जोशी,  व 23 जुलै रोजी खापर गट नोडल अधिकारी म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे   सहाय्यक प्रकल्प अधिकारी सी़ए़ अहिरे आदींची नियुक्ती करण्यात आली आह़े मेळाव्याला गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, स्वस्त धान्य दुकानदार, विद्युत मंडळाचे कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, विमा योजनेचे प्रतिनिधी, लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी, तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे संबंधित  अधिकारी व कर्मचारी अशा प्रकारे त्या-त्या विभागाच विभाग प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आलेले आहेत़
 

Web Title: Appointment of nodal officer in Taloda, Akkalakuta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.