पाणीपुरवठय़ाच्या पाईपांनी ‘एअर’ पकडल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:59 AM2019-08-13T11:59:26+5:302019-08-13T11:59:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने शनिवारपासून शहरात नळांना पाणी आलेले नाही़ सोमवारी पालिकेने ...

Artificial water shortage in the city by catching 'air' with water supply pipes | पाणीपुरवठय़ाच्या पाईपांनी ‘एअर’ पकडल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई

पाणीपुरवठय़ाच्या पाईपांनी ‘एअर’ पकडल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने शनिवारपासून शहरात नळांना पाणी आलेले नाही़ सोमवारी पालिकेने पाईपलाईन जोडून दिल्यानंतरही पाईपांनी ‘एअर’ पकडल्याने शहरात पाणी पोहोचू शकलेले नाही़ मंगळवारी दुपार्पयत शहरात सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
शहरात पाणीपुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पातून जलवाहिनी टाकण्यात आली आह़े 8 व 9 ऑगस्ट रोजी अतीवृष्टीमुळे टोकरतलाव गावाजवळील नाल्याला  पूर    आल्याने पाईप लाईन तुटली होती़ यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा अनुभव नागरिकांना येत आह़े पालिकेच्या कर्मचा:यांनी सोमवारी पहाटेर्पयत पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण केले होत़े यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल या अपेक्षेने पंपींग स्टेशनवरुन पाणी सोडण्यात आले होत़े परंतू पाईपांनी एअर पकडल्याने पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होऊ शकलेले नाही़ परिणामी पाणी सोमवारी दुपार्पयत जिल्हा रुग्णालयार्पयतच आल्याची माहिती आह़े नंदुरबार शहरात एकूण 16 जलकुंभ असून तेथवर पाणी पोहोचते करण्यासाठी प्रेशर नसल्याने पाणी वितरणात अडचणी येत आहेत़ 
शहरात एकूण दीड कोटी लीटरची दर दिवशीची मागणी आह़े पाणीपुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिक हैराण झाले असून सोमवारी सकाळपासून रहिवासी वसाहतींमध्ये टँकर खरेदी करत गरज भागवण्यात येत असल्याचे चित्र दिसून आले होत़े 
 

Web Title: Artificial water shortage in the city by catching 'air' with water supply pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.