मतदारसंघातील जनतेसाठी 24 तास उपलब्ध राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:29 PM2019-10-29T12:29:32+5:302019-10-29T12:29:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासकीय सेवेतून थेट जनतेच्या सेवेत दाखल झालो आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या, प्रश्न सोडविण्याला आपले ...

Be available to the people in the constituency | मतदारसंघातील जनतेसाठी 24 तास उपलब्ध राहणार

मतदारसंघातील जनतेसाठी 24 तास उपलब्ध राहणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रशासकीय सेवेतून थेट जनतेच्या सेवेत दाखल झालो आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या, प्रश्न सोडविण्याला आपले प्रथम प्राधान्य राहिल. त्यासाठी 24 तास आपण लोकांना उपलब्ध राहणार आहोत. तळोदा, म्हसावद, शहादा येथे संपर्क कार्यालये सुरू करून महिन्याला एकदा या ठिकाणी जनता दरबार भरवून समस्या व प्रश्न सोडविणे, योजनांचा लाभ देणे यासाठी आपला प्रय} राहणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. 
शहादा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी रविवार, 27 रोजी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’तर्फे त्यांचा सत्कार व स्वागत कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील व मनोज शेलार यांनी केले. आमदार पाडवी यांनी आपले आगामी व्हिजन, काम करण्याची पद्धत, विकासाच्या योजना आणि संघटनात्मक पातळीवरील काम याबाबत सविस्तर चर्चा केली. आमदार पाडवी यांनी सांगितले, मुळात आपण 30 वर्षापासून मुंबईत आहोत. चार वर्ष शिक्षणाचे आणि 26 वर्ष नोकरीचे. असे असले तरी गावाशी, परिसराशी आणि समाजाशी नाळ तुटू दिली नाही. समाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करीत राहिलो. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यात अशा काही घडामोडी घडल्या आणि आपल्याला प्रशासकीय सेवा सोडून जनतेच्या सेवेत यावे लागले. 
मतदारसंघात गेल्या दोन ते तीन महिन्यात फिरलो, प्रचारासाठी गावोगावी गेलो. त्यावेळी समोर आलेल्या समस्या, लोकांचे प्रश्न, विकासाचा अनुशेष, बेरोजगारी आणि सिंचन व पिण्याचे पाणी या मुलभूत गोष्टींपासून अनेक भाग वंचीत आहे. त्यामुळे या काळात आपण एक व्हिजन तयार केले. निवडून आलो आणि नाही आलो तरी ते व्हिजन पुर्ण करायचेच हे ठरविले. जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आता हे व्हिजन पुर्ण करणारच असा ठाम विश्वास व्यक्त करून त्यांनी येत्या पाच वर्षात मतदारसंघाचा कायापालट झालेला दिसेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
आपल्या विजयात तरुणांचे योगदान आणि त्यांची मेहनत मोठी आहे. त्यामुळे तरुणांसाठी अनेक योजना आपल्या डोक्यात आहेत. त्यात गावागावात व्यायामशाळा उभारणे, क्रिडा क्षेत्राला प्राधान्य देणे, ठराविक कालावधीत विविध क्रिडा स्पर्धा भरविणे, नामवंत क्रिडापटूंना येथे आणून त्यांचे मार्गदर्शन युवकांना देण्यात येणार आहे. आपण स्वत: क्रिडापटू होतो. 30 कि.मी.धावण्यात आपली ओळख होती. रेंज शुटींग आणि इतर खेळात प्राविण्यप्राप्त होतो. त्यामुळे क्रिडा क्षेत्राला प्राधान्य राहणार आहे. शिवाय  गाव तेथे वाचनालये सुरू करून वाचनाची गोडी लावण्यासाठी प्रय} राहणार आहेत. याशिवाय रोजगारासाठी जास्तीत जास्त प्रय} राहणार आहे. तळोद्यातील एमआयडीसी रखडली आहे त्याला चालना देणार, प्रत्येकाला नोकरी मिळेलच असे नाही. त्यामुळे युवकांकडे असलेले स्किल्स डेव्हलप करून त्यांना त्यांच्या स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात तयार करणार आहे. शेतीपुरक उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. युवकांसाठीच्या असलेल्या सर्व योजना गावपातळीर्पयत आणण्यासाठीचे प्रय} आपले राहणार आहे. 
जिल्ह्यात विशेषत: मतदारसंघात स्लांतराचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे स्थलांतर रोखणे, हा प्रश्न विधानसभेर्पयत पोहचवून त्याद्वारे उपाययोजना करण्यासाठी आपला प्रय} राहणार आहे. स्थलांतरीत मजुरांचे सव्र्हेक्षण करून त्यांची  नोंदणी करण्यासाठी प्रशासनाला सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
सिंचनाबाबत बोलतांना आमदार पाडवी म्हणाले, मतदारसंघात सिंचनाचे प्रश्न रखडले आहेत. काही ठिकाणी दुरूस्तीची कामे आहेत अशा सर्व कामांचे सव्र्हेक्षण करून शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. विशेषत: सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांमध्ये मुलभूत सुविधांचा अभाव आहे तो दूर करण्यासाठी आपला प्रय} राहणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. 


राजकारणाचा आपल्याला कुठलाही गंध नव्हता. परंतु पोलीस दलात सेवा करतांना माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख, तत्कालीन आमदार नारायण राणे यांचा बॉडीगार्ड पथकात काम केले आहे. त्यामुळे या दोन नेत्यांचे काम जवळून पहाण्याचा योग आला आहे. जनतेशी असलेले नाते आणि समस्या व प्रश्न सोडविण्याचे कसब त्यांच्याकडून शिकता आले आहे. त्यामुळे त्याचा उपयोग आमदार म्हणून काम करतांना नक्कीच करणार आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासू लोकांचे मते जाणून घेत कामं करणार आहे. निधी व योजना परत जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. पक्षातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी, नेते यांचा सोबत घेवून काम करायचं आहे. विरोधकांनी देखील विधायक कामांना साथ देत प्रोत्साहित केले तर शहादा-तळोदा मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ म्हणून आपण नावारुपाला आणणार आहोत. त्यासाठी मात्र सर्व घटकांची साथ आणि लोकांचे आशिर्वाद मिळणे आवश्यक असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी स्पष्ट केले. 

4कुपोषणासंदर्भात शासनाच्या विविध योजना आहेत, परंतु त्यांची तळार्पयत अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे हा प्रश्न सुटू शकला नाही. आपण या प्रश्नात लक्ष देणार आहोत. यातील प्रत्येक योजना लाभार्थीर्पयत पोहचविणार आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. 
मंत्रीपदाबाबत माहिती नाही. एवढय़ा मोठय़ा पक्षाने आपल्याला संधी दिली, निवडून आणले त्यातच आपल्याला समाधान आहे. पक्षाने मंत्रपदाची जबाबदारी दिलीच तर ती निष्ठेने पार पाडणार.
क्रिडा क्षेत्रात आपल्याला विशेष रस आहे. सातपुडय़ातील द:याखो:यातील खेळाडू चपळ आहेत. केवळ त्यांना मुळ स्वरूपात मार्गदर्शन केले गेले पाहिजे. मला स्वत:ला पीएसआय भरती परिक्षेत मैदानी चाचणीत 200 पैकी 200 गुण होते. 
गावागावात विजेचे दिवे लावून आणि सामाजिक सभागृहे बांधून विकास होत नाही. त्यासाठी लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिला तर तो खरा विकास ठरतो.
 

Web Title: Be available to the people in the constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.