नंदुरबार जिल्ह्यातील 770 शेतक:यांना यांत्रिकीकरणाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:07 PM2018-07-12T12:07:01+5:302018-07-12T12:07:23+5:30

कृषी विभाग : अडीच हजार शेतक:यांनी दिले होते प्रस्ताव

The benefits of mechanization to 770 farmers of Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यातील 770 शेतक:यांना यांत्रिकीकरणाचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील 770 शेतक:यांना यांत्रिकीकरणाचा लाभ

Next

नंदुरबार : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून गेल्या वर्षात राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना व  कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत शेतक:यांनी प्रस्ताव  दिले होत़े यातून 770 शेतक:यांनी ट्रॅक्टर आणि इतर यंत्रे खरेदी करत यांत्रिकी शेतीला सुरुवात केली आह़े   
जिल्ह्यात अन्नधान्य उत्पादनात वाढ करून बहुपीक शेतीपद्धतीतून शेतक:यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी अन्न सुरक्षा योजना राबवण्यात येत आह़े योजनेंतर्गत यांत्रिकीकरण उपअभियाना कृषी विभाग राबवत आह़े यात शेतक:यांना कृषी औजारे आणि ट्रॅक्टर, पावर टिलर यासह विविध साधनांची अनुदानावर खरेदी करून देण्यात येत आह़े 2017-18 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी तब्बल 2 हजार 431 लाभार्थीनी अर्ज केले होत़े यातून 770 लाभार्थीनी प्रत्यक्ष साहित्याची खरेदी केली होती़ येत्या वर्षात या वर्षात योजनेत 1 हजार शेतक:यांना सामावून घेण्याचा कृषी विभागाचे प्रयत्न असून तालुका स्तरावरून जनजागृती होत आह़ेशेतक:यांना गेल्या वर्षात कृषी विभागाकडून अन्नसुरक्षा अभियानांतर्गत बहुपीक पेरणी यंत्र, पेरणी यंत्र, रोटोव्हेटर, रीज फरो प्लान्टर, बहूपीक मळणी यंत्रांचे वाटप करण्यात आले होत़े एकूण 33 यंत्रांसाठी 1 कोटी 57 लाख 73 हजार रुपयांचा निधी शेतक:यांना वर्ग करण्यात आला होता़ कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत 20 ते 40 हॉर्सपावर क्षमतेचे ट्रॅक्टर, पावर टिलर आदी 57 यंत्रांचे वितरण करण्यात आले होत़े यासाठी एकूण 4 कोटी 72 लाख 77 हजार 59 रुपयांचा निधी लाभार्थीसाठी मंजूर करण्यात आला होता़ नाशिक विभागस्तरावरून गेल्या वर्षात जिल्ह्यातील ट्रॅक्टर घेणा:या लाभार्थीना केंद्र सरकारकडून 21 लाख 75 हजार, राज्य शासनाकडून 14 लाख 50 हजार असा एकूण  36 लाख 25 हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता़ तर इतर औजारे घेणा:या लाभार्थीना 54 लाख 49 हजारांचा निधी मिळाला होता़ यात केंद्र सरकार 32 लाख 69 तर राज्य शासनाकडून 21 लाख 80 हजार वर्ग केले होत़े अन्नसुरक्षा अभियानात यांत्रिकीकरणातून पीक उत्पादनवाढीसोबतच पिकांचे व्यवस्थापनावरही लक्ष केंद्रित करण्यात आले होत़े यातून सलग गट प्रात्यक्षिकांची शिबिरे घेण्यात आली  होती़             यात तूर, मूग, उडीद आणि हरभरा प्रात्यक्षिकात हेक्टरी 5 हजार 350 ते 7 हजार 500 रुपये अनुदान शेतक:यांना कृषी विभागाकडून मिळाले होत़े या प्रात्यक्षिकांचा 730 शेतक:यांनी लाभ घेतला होता़ आंतरपिकांच्या वाढीसाठी तूर आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 4 हजार 150 रुपयांचे अनुदान शेतक:यांना देय होत़े याचा 720 शेतक:यांनी लाभ घेत पीक प्रात्यक्षिक करून घेतले होत़े
 पिक पद्धतीवर आधारित विविध पिकांच्या प्रात्यक्षिकात 5 हजार 888 ते 9 हजार 400 रुपये अनुदान देय असलेल्या पिकांसाठी 1 हजार 840 शेतकरी सहभागी होत़े 
 

Web Title: The benefits of mechanization to 770 farmers of Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.