जुनापानी येथे बिबटय़ाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:55 PM2019-08-03T12:55:25+5:302019-08-03T12:55:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेशातील जुनापानी ता.पानसेमल येथे बिबटय़ाने एकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती़ ...

Bibtaya attack at Junapani | जुनापानी येथे बिबटय़ाचा हल्ला

जुनापानी येथे बिबटय़ाचा हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : मध्यप्रदेशातील जुनापानी ता.पानसेमल येथे बिबटय़ाने एकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती़ जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल़े
बरफा रेवा नवरे असे जखमीचे नाव असून बुधवारी पहाटेच्या सुमारास नवरे हे गुरे पाहण्यासाठी उठले होत़े गोठय़ातून घराकडे परत जात असताना मागून आलेल्या बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला़ बिबटय़ाने नवरे यांच्या डोक्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला़ यात त्यांच्या डोक्यावर बिबटय़ाचा पंजा लागल्याने ते गंभीर जखमी झाल़े  ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमीस तात्काळ पानसेमल येथील आरोग्य केंद्रात दाखल करुन उपचार करण्यात आल़े तात्काळ उपचार मिळाल्याने बरफा नवरे यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आह़े
जुनापानी परिसरात सध्या बिबटय़ाने धुमाकूळ घातला आह़े बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत़ यातील एका पिंज:यातील शेळीला भक्ष्यक करत बिबटय़ाने पळ काढला होता़ सेंधवा वनविभागाचे अधिकारी डीएफओ केशवसिंह पट्टा, एसडीएफओ विजय गुप्ता, उपवनमंडळ अधिकारी नोरके, पानसेमल वनपरिक्षेत्र सहाय्यक प्रदीप पवार, खेतिया वनपरिक्षेत्र सहाय्यक भुरू  खान, खेतिया व पानसेमल वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील, अनिल चौहान, संतोष आलोने, जितेंद्र मुवेल हे बिबटय़ाचा महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सिमावर्ती भागात बिबटय़ावर लक्ष ठेवून आहेत़ 
 

Web Title: Bibtaya attack at Junapani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.