लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे राजेश उदेसिंग पाडवी हे 7991 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे पद्माकर वळवी यांचा पराभव करीत हा मतदारसंघ भाजपाकडे राखण्यात यश मिळवल़ेशहादा -तळोदा विधानसभा संघाची मतमोजणी दुपारी साधारण 11. 30 वाजता पुर्ण झाली. येथील नवीन तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली मतमोजणी साठी 14 टेबलवर 25 फे:या करण्यात आल्या़ पोस्टल मतदानासह 2 लाख 10 हजार 389 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़ या मतदारसंघात भाजपाचे राजेश उदेसिंग पाडवी यांना सुमारे 94 हजार 931 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड़ पद्माकर वळवी यांना 86 हजार 940 मते मिळाली. राजेश पाडवी हे 7 हजार 991 मतानी विजयी झाल़़े तर माकपाचे जयसिंग माळी यांना 4 हजार 60 आणि अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा यांना 21 हजार 113 मते मिळाली़ नोटाला तब्बल 3 हजार 449 मतदारांनी पसंती दिली़ पोस्टल बॅलेट मतदानातून 126 मते बाद झाली आहेत़ दरम्यान, मतमोजणी सुरू असताना पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे पद्माकर वळवी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती ही आघाडी सहाव्या फेरीपयर्ंत कायम होती़ त्यामुळे काँग्रेस गोटात आनंदाचे वातावरण होते मात्र सातव्या फेरीपासून भाजपाचे राजेश पाडवी यांनी वळवी यांची आघाडी कमी करीत आघाडी मिळविण्यास सुरवात केल्यानंतर ही आघाडी वाढतच गेली़ त्यामुळे भाजपाच्या गोटात उत्साह संचारला होता़ संचारलेला हा उत्साह विजय प्राप्त झाल्यानंतर शिगेला पोहोचला होता़ भाजपाच्या या विजयामुळे काँगेस गोटात शांतता पसरली तरी देखील पद्माकर वळवी यांनी एकाकी खिंड लढवत मिळवलेली मते देखील राजकीय धुरिणाना विचार करण्यास भाग पाडणारी आहेत़ निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी डॉ़चेतन गिरासे, तहसिलदार डॉ. मिलींद कुलकर्णी, पंकज लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक कर्मचा:यांकडून प्रक्रिया पुर्ण करुन घेतली़
राजेश पाडवी यांच्या विजयानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमाणपत्र मिळण्यास उशीर असल्याचे समजताच सर्व विजयी उमेदवार पाडवींसह भाजपाचे सर्व पदाधिकारी शहरातील महात्मा गांधी, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांर्पयत रॅली काढून अभिवादन केल़े शहरात तीन गटांकडून एकाच वेळी वेगवेगळ्या विजयी रॅली काढण्यात आल्या़ विजयी मिरवणूकीत गट-तट उफाळून आल्याने उपस्थितांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होत़े